म्हणी-"एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत"

Started by Atul Kaviraje, October 17, 2021, 03:19:08 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत"

                                           म्हणी
                                        क्रमांक -58
                         "एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत"
                        -----------------------------------------

58. एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत
    ----------------------------------------

--दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविदाने नांदू शकत नाहीत दोन सवती एका घरात सुखासमाधानाने राहू शकत नाहीत.
--दोन तेजस्वी माणसे गुण्या-गोविंदाने राहू शकत नाहीत.
--दोन तडफदार प्रभावी व्यक्तिमत्व एकाच ठिकाणी काम करणं थोडा अवघड असतं कारण मतभेद असतील तर ते तीव्रपणे मांडण्याची सवय असते थोडक्यात दोन माणसं एकमेकांना छेद देऊ शकतात दुखवू शकतात .
--लोकात एकदा की नाचक्की झाली की लोकं त्याच दृष्टीने पाहतात.
--दोन एक समान  स्वभावाच्या व्यक्ती एका घरात राहू शकत नाही.
--दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविंदाने नांदू शकत नाही.
--एकाच धंद्याची माणसे एकमेकांचा मत्सर केल्याशिवाय राहात नाहीत.
--दोन महान माणसे एकत्र गुण्यागोविंदाने राहू शकत नाहीत.
--वाक्य वापर : नेताजींच्या राजकीय पक्षाच्या एका म्यानात दोन तलवारी कशा राहणार?

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.10.2021-रविवार.