शेतकरी जगलाच पाहिजे

Started by marathi, February 15, 2009, 07:55:31 PM

Previous topic - Next topic

marathi

शेतकरी जगलाच पाहिजे
बडबड करीत स्वताशी मी मंडईत शिरलो
भाव एकुण भाज्यांचे भलताच चिडलो
टम्याटो २० आणि कांदे ३०
सांगा ना सामान्य माणसाने कसे जगायाचे ?
भाजी पालाच इतका महाग मग काय खायचे ?
रागाला स्वताच्या आवारात कसा बसा सावरत
इकडे तिकडे फिरू लागलो .
काही स्वस्त मिळते का शोधु लागलो
इतक्यात एक बारकस पोरग
काही तरी घेवुण भाजीवाल्याकडे आल
दारावरून हमरी तुमरी करुन बोलु लागल
काय शेतकर्याने २,३ रूपये वाढीला घासाघीस करताय
इकडे तिकडे बघा सगलीकडे रेट कसे चढ़ताहेत
२ रुपयाचा चहा आता ५ ला घेताच ना ?
महगाई महगाई करीत ही कोल्ड ड्रिंक पिताच ना ?
आहो २५ रु. कोलगेट ५५ वर गेलिये
बिस्किट वाल्याची वजन कमी करायची युक्ति आता जुनी झालिये
मग शेतकर्याने थोड वाढवून मागितले तर तुमचे का दुखते
हे एकल आणि वाटले खरच आपलेच चुकते
नाही विचार त्याचा ही केलाच पाहिजे
शेवटी तो आहे तर आपन
म्हणुन शेतकरी जगलाच पाहिजे
============================
ღ ღसुगंधღ ღ 16/1/09

santoshi.world

kharach शेतकरी जगलाच पाहिजे ..........

Siddhesh Baji

शेतकरी जगलाच पाहिजे ..........
chaan ahe kaviita masst

gaurig