वास्तव चारोळ्या-"कारागृहात लावलेत सी.सी.टी.व्ही.कॅमेरे,सैल झालेत जेलमधील पहारे!"

Started by Atul Kaviraje, October 20, 2021, 12:58:33 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                      विषय : कारागृहात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे
                             विनोदी वास्तव चारोळ्या
      "कारागृहात लावलेत सी.सी.टी.व्ही.कॅमेरे,सैल झालेत जेलमधील पहारे!"
                                     (भाग-१)
    ----------------------------------------------------------------


(१)
"CCTV कॅमेऱ्यांनी" काबीज केलयं कारागृहही
कैद्यांवर तिसरा डोळा ठेवतोय देखरेख
"T V"-वर त्यांची दिसतेय दिनचर्या,
आधुनिक विज्ञानाचा म्हणा रे बाप्पा मोरया.

(२)
आज सारे पोलीस रजेवर आहेत
जेलरही खुर्चीवर बसून सुस्तावलाय
CCTV कॅमेऱ्यावर "जेलची" सारी मदार,
आज आहेत "जेलची" सारी उघडी दारं.

(३)
"पहारा" पोलिसांचा ढिला पडलाय
त्यात नेहमीची शिस्त नाही
कधी एकदा वीज जाते अन,
पलायनाच्या वाटेवर कैद्यांचा डोळा राही.

(४)
कैदी कैदखान्यात येरझाऱ्या घालतोय
त्याला फिरता "कॅमेरा" टिपतोय
कैदी थांबला की तोही थांबतोय,
"CCTV कॅमेरा" आपले कर्तव्य चोख बजावतोय.

(५)
"कारागृही CCTV कॅमेऱ्यांचा" खच पडलाय
रोजच्या रोज संख्या वाढत चाललीय
आयुष्यभर कैद्यांची पाठ-राखण करणाऱ्या "CCTV कॅमेऱ्यांची",
कैद्यांसोबत साश्रू नयनांनी पाठवणी चाललीय.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.10.2021-बुधवार.