"२३ ऑक्टोबर– दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, October 25, 2021, 02:47:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

      दिनांक-२३.१०.२०२१-शनिवार. जाणून घेऊया, या दिवसाचे "दिन-विशेष"


                                    "२३ ऑक्टोबर– दिनविशेष"
                                   --------------------------


अ) २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या घटना.
    -------------------------------

१७०७: ग्रेट ब्रिटनची पहिली संसदेची बैठक.

१८५०: अमेरिकेत पहिले राष्ट्रीय महिला हक्क संमेलन सुरु झाले.

१८९०: हरी नारायण आपटे यांनी करमणूक या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.

१९४४: दुसरे महायुद्ध – सोविएत लाल सैन्याने (Red Army) हंगेरीत प्रवेश केला.

१९७३: संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) निर्बंध घातल्यामुळे इस्त्रायल व सीरीयामधील युद्ध संपुष्टात आले.

१९९७: सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना प्रदान.

=========================================

ब) २३ ऑक्टोबर रोजी झालेले जन्म.
   -----------------------------

१७७८: कित्तूरची राणी चन्नम्मा यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १८२९)

१८७९: वैदिक धर्माचे पुरस्कर्ते शंकर रामचंद्र तथा अहिताग्नी राजवाडे यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९५२)

१९००: इंग्लिश क्रिकेटपटू डग्लस जार्डिन यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १९५८)

१९२३: श्री विद्या प्रकाशन चे संस्थापक दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी २०००)

१९२३: भारतीय-पाकिस्तानी भाषाशास्त्रज्ञ, लेखक आणि विद्वान असलम फारुखी यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुन २०१६)

१९२४: संगीतकार, गायक व नट संगीतभूषण पं. राम मराठे यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १९८९)

१९३७: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते देवेन वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर २०१४)

१९४०: ब्राझिलियन फुटबॉल खेळाडू पेले यांचा जन्म.

१९४५: अभिनेते व नाट्यनिर्माते शफी इनामदार यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १९९६)

१९७४: भारतीय पत्रकार आणि लेखक अरविंद अडिगा यांचा जन्म.

=========================================

क) २३ ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू.
    ----------------------------

१९१०: थायलँडचा राजा चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) यांचे निधन. (जन्म: २० सप्टेंबर १८५३)

१९१५: इंग्लिश क्रिकेटपटू डब्ल्यू. जी. ग्रेस यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १८४८)

१९२१: चाकाच्या आत हवा भरलेली नळी (tube) वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक तसेच डनलॉप रबर चे संस्थापक जॉन बॉईड डनलॉप यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १८४०)

१९५७: ख्रिश्चन डायर एस.ए. चे संस्थापक ख्रिश्चन डायर यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९०५)

२०१२: बंगाली कवी व कादंबरीकार सुनील गंगोपाध्याय यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९३४)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.10.2021-सोमवार.