"२५ ऑक्टोबर– दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, October 25, 2021, 03:21:04 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२५.१०.२०२१-सोमवार. जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                     "२५ ऑक्टोबर– दिनविशेष"
                                    -------------------------


अ) २५ ऑक्टोबर रोजी झालेल्या घटना.
   --------------------------------

१८६१: टोरांटो स्टॉक एक्सचेंज सुरु झाले.

१९५१: स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणूकांना सुरुवात झाली.

१९६२: युगांडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९९४: ए. एम. अहमदी यांनी भारताचे २६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९९९: दक्षिण अफ्रिकेतील लेखक जे. एम. कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे बूकर पारितोषिक दुसर्‍यांदा मिळाले.

२००९: बगदाद, इराक येथे झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात १५५ जण ठार तर ७२१ जण जखमी झाले.

=========================================

ब) २५ ऑक्टोबर रोजी झालेले जन्म.
   -----------------------------

८४०: सफारीड राजघराण्याचे संस्थापक यकब इब्न अल-लेथ अल-सैफर यांचा जन्म.

१८६४: डॉज ऑटोमोबाईल कंपनीचे सहसंस्थापक जॉन फ्रान्सिस लबाडी यांचा जन्म. (मृत्यू: १४ जानेवारी १९२०)

१८८१: स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार पाब्लो पिकासो यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९७३)

१९३७: संगीत समीक्षक डॉ. अशोक रानडे यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै २०११)

१९४५: अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि पटकथालेखिका अपर्णा सेन यांचा जन्म.

=========================================

क) २५ ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू.
    ----------------------------

१६४७: इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचा (barometer) संशोधक इव्हानजेलिस्टा टॉरिसेली यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १६०८)

१९५५: शास्त्रीय गायक पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर यांचे निधन. (जन्म: २८ मे १९२१)

१९६०: फर्ग्युसन कंपनी चे संस्थापक हॅरी फर्ग्युसन यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १८८४)

१९८०: शायर व गीतकार अब्दूल हयी ऊर्फ साहिर लुधियानवी यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १९२१)

२००३: कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ पांडुरंगशास्त्री आठवले यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९२०)

२००९: अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १९२३)

२०१२: विनोदी अभिनेते जसपाल भट्टी यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १९५५)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.10.2021-सोमवार.