"२९ ऑक्टोबर– दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, October 29, 2021, 05:52:25 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२९.१०.२०२१-शुक्रवार. जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                    "२९ ऑक्टोबर– दिनविशेष"
                                   --------------------------


अ) २९ ऑक्टोबर रोजी झालेल्या घटना.
   --------------------------------

१८९४: महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेची स्थापना.

१९२२: बेनिटो मुसोलिनी इटलीचे पंतप्रधान बनले.

१९५८: महर्षि धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्‍न पुरस्कार प्रदान.

१९६१: संयुक्त अरब प्रजासत्ताकमधून सीरिया देश बाहेर पडले.

१९६४: टांगानिका व झांजिबार एकत्र येऊन टांझानिया हा देश बनला.

१९९४: विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणारा होमी भाभा पुरस्कार डॉ. टी. ज्ञानशेखरन आणि आर. ई. के. मूर्ती यांना विभागून जाहीर.

१९९६: स्वदेशात बनविलेली कामिनी ही ३० मेगावॉट क्षमतेची अणूभट्टी कल्पक्‍कम येथे कार्यान्वित करण्यात आली.

१९९६: मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या तानसेन पुरस्कारासाठी शास्त्रीय गायिका गिरीजादेवी यांची निवड.

१९९७: माणिक वर्मा प्रतिष्ठानचा पहिला 'माणिकर‍त्‍न पुरस्कार' गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांना जाहीर.

१९९७: अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर.

१९९९: चक्रीवादळाच्या तडाख्याने ओरिसात अतोनात नुकसान.

२००५: दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात दिल्लीमध्ये ६० पेक्षा जास्त व्यक्ती ठार.

२००८: डेल्टा एअरलाईन्सचे नॉर्थवेस्ट एअरलाईन्समधे विलीनीकरण होऊन नॉर्थवेस्ट एअरलाईन्स ही जगातील सर्वात मोठी विमान वाहतुक कंपनी बनली.

२०१५: चीन देशातील एक-मूल धोरण ३५ वर्षांनंतर बंद करण्यात आले.

=========================================

ब) २९ ऑक्टोबर रोजी झालेले जन्म.
   -----------------------------

१८९७: जर्मनीचे चॅन्सेलर व नाझी नेते जोसेफ गोबेल्स यांचा जन्म. (मृत्यू: १ मे १९४५)

१९३१: साहित्यिक व पटकथालेखक प्रभाकर तामणे यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च २०००)

१९७१: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन यांचा जन्म.

१९८५: इंग्लिश मोटरसायकल रेसर कॅल क्रचलो यांचा जन्म.

१९८५: भारतीय बॉक्सर विजेंदर सिंग यांचा जन्म.

=========================================

क) २९ ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू.
    ----------------------------

१९११: हंगेरीयन-अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक जोसेफ पुलित्झर यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १८४७)

१९३३: फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ पॉल पेनलीव्ह यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १८६३)

१९७८: भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल १८९५)

१९८१: अभिनेते दादा साळवी यांचे निधन.

१९८८: मॅगसेसे पुरस्कार विजेत्या स्वातंत्र्यसैनिक व सामाजिक कार्यकर्त्या कमलादेवी चट्टोपाध्याय यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १९०३)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.10.2021-शुक्रवार.