म्हणी- "काळ आला होता, पण वेळ आली नव्हती"-भाग-१

Started by Atul Kaviraje, October 29, 2021, 06:31:53 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे -"काळ आला होता, पण वेळ आली नव्हती"

                                          म्हणी
                                       क्रमांक -64
                          "काळ आला होता, पण वेळ आली नव्हती"
                        ---------------------------------------


64. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती.
    -------------------------------------

--नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे.
--मरण समोर उभे असताना थोडक्यात बचावणे.
--एखाद्यावर आलेलं मोठं संकट टळणे.
--प्राणांतिक संकटातून वाचणे.
--एखादे घोर संकट येऊनही त्यातून सहीसलामत सुटणे.
--नाशाची परिस्‍थिति जमून आली होती पण नाश होण्याचे राहिले. अगदी जवळ जवळ जिवावर बेतण्याचा प्रसंग आला असतां त्‍यांतून निभावल्‍यास म्‍हणतात. (प्रत्‍येकाच्या मृत्‍युची ठराविक वेळ असते असा समज).


                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                   --------------------------------------------

                    उदाहरण-बातमी---

      'काळ आला होता... पण वेळ आली नव्हती,' या म्हणीचा प्रत्यय कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात शनिवारी आला. एका तरुणाने येथील पांढऱ्या वाघाच्या पिंजऱ्यात उडी मारली. सुरक्षारक्षकांनी तातडीने त्याला बाहेर काढल्यामुळे त्याचे प्राण बचावले. या सर्व प्रकारामुळे उद्यानात एकच गोंधळ उडाला आणि सर्वांना दिल्लीतील घटनेची आठवण झाली.

     शुद्धोदन बाबाराव वानखडे (वय २४ रा. खराबवाडी,चाकण, मूळ जि.अकोला) असे उडी मारलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरोधात सुरक्षारक्षक शामराव भिमशा कांबळे (वय ५९) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार त्याच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेबाबत त्याच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुद्धोधन हा मूळचा अकोला जिल्ह्यातील असून काही दिवसांपूर्वी तो चाकण परिसरात भावाकडे राहण्यास आला होता. शनिवारी दुपारी तो एकटाच राजीव गांधी उद्यान पाहण्यासाठी आला होता. शनिवारच्या सुटीमुळे उद्यानात मोठी गर्दी होती. शुद्धोधन वाघांच्या पिंजऱ्याजवळ जाऊन मोबाइलमध्ये फोटो काढत होता. त्याने जाळीवरून एका वाघाच्या पिंजऱ्यात उतरण्याचा प्रयत्न केला. रक्षकांनी त्याला अडविले. त्यामुळे चिडलेल्या शुद्धोधनने शेजारच्या पांढऱ्या रंगाच्या कैफ वाघाच्या पिंजऱ्यात उडी घेतली. दुरून वाघाला इशारे करीत त्याला डिवचण्याचाही प्रयत्न केला. रक्षकांनी तातडीने छोट्या दरवाजातून प्रवेश करून त्याला सुखरूप बाहेर काढले. या घटनेनंतर उद्यानात एकच गोंधळ उडाला.

     भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ' माझ्या अंगात एक बाबा असून त्यामुळे मला काही होत नाही, 'असे त्याने सांगितल्याने पोलिसही चक्रावून गेले. शुद्धोधन याने वाघाच्या डोक्यावर हात ठेवल्याची चर्चाही होती.

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
                    ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.10.2021-शुक्रवार.