पुरावा

Started by Mrs.KK, October 30, 2021, 03:43:39 AM

Previous topic - Next topic

Mrs.KK

          *पुरावा *
नाही मन लागतं तुझ्याशिवाय आता
वाटते असे कुठे हरवलाय माझा चाफा
कसा आलाय बघ ना हा दुरावा
काय देऊ तुला माझ्या पक्या मैत्रीचा पुरावा
आठवते ते दिवस तुझ्यात मी रंगले होते
हसून हसून गोड दिवस कसे ते सरले होते
आता मात्र खोटे हसू आणावे लागते
सारे काही जणू अचानक संपल्या सारखे वाटते
नको आता विचारू हसण्याचे गुपित माझ्या
कित्येक हुंदक्यांनी कोंडला हा जीव माझा
तू दूर असल्याचे क्षण नको होते मला
तरी सुद्धा तू दूर आहेस याची चाहूल लागली माझ्या मनाला
कधी संपेल हा काळ कधी येशील पुन्हा तू भेटाया
येताच आठवण तुझी मन लागते तुला शोधाया
मन हे आठवणींच्या दुनियेत रोज तुला भेटून येते
पापण्यांत मात्र अलगद पाणी दाटून येते
तुला भेटण्याची इच्छा प्रत्येक वेळी तीव्र झाली
पण तुला कधी याची चाहूल नाही लागू दिली
हळू हळू असाच माझा नित्यक्रम होत आहे
तुला भेटण्याची इच्छा बाळगून मी निराश घरी परतत आहे
सांग ना कसा देऊ माझ्या मैत्रीचा पुरावा
कधी संपेल हा आपला असह्य दुरावा.....


कवी - Mrs. KK



Nachi