"३० ऑक्टोबर– दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, October 30, 2021, 04:30:19 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.१०.२०२१-शनिवार. जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                     "३० ऑक्टोबर– दिनविशेष"
                                   ---------------------------


अ) ३० ऑक्टोबर रोजी झालेल्या घटना.
   -------------------------------

१९२०: सिडनी येथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ ऑस्ट्रेलियाची स्थापना.

१९२८: लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणार्‍या लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठीहल्ला केला.

१९४५: भारताला संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) सदस्यत्त्व मिळाले.

१९६६: शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला.

१९७३: इस्तंबुलमधील बॉस्पोरस पूल पूर्ण झाल्यामुळे युरोप आणि आशिया जोडले गेले.

१९९५: कॅनडातील क्‍वेबेक प्रांताने विभक्त होण्यासाठी घेतलेल्या सार्वमतात जनतेने ५०.६% विरुद्ध ४९.४% मतांनी कॅनडातच राहण्याचा निर्णय दिला.

२०१३: सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीतील शेवटचा रणजी सामना खेळला.

=========================================

ब) ३० ऑक्टोबर रोजी झालेले जन्म.
   -----------------------------

१७३५:अमेरिकेचे २ रे राष्ट्राध्यक्ष आणि पहिले उपराष्ट्राध्यक्ष जॉन अ‍ॅडॅम्स यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १८२६)

१८८७: बंगाली साहित्यिक आणि संदेश या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक सुकुमार रॉय यांचा जन्म. (मृत्यू: १० सप्टेंबर १९२३)

१९०९: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी १९६६)

१९३२: भारतीय इतिहासकार आणि लेखक बरुन डी यांचा जन्म. (मृत्यू: १६ जुलै २०१३)

१९४९: केन्द्रीय मंत्री व राज्यसभा खासदार प्रमोद महाजन यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे २००६)

१९५१: भारतीय ड्रमर आणि गीतकार त्रिलोक गुर्टू यांचा जन्म.

१९६०: अर्जेंटिनाचे फूटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचा जन्म.

=========================================

क) ३० ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू.
   -----------------------------

१८८३: भारतीय तत्त्वज्ञ आणि विद्वान दयानंद सरस्वती यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८२४)

१९७४: गझल, दादरा आणि ठुमरी गायिका बेगम अख्तर यांचे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १९१४)

१९९०: चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते व्ही. शांताराम यांचे निधन. (जन्म: १८ नोव्हेंबर १९०१)

१९९०: अभिनेता विनोद मेहरा यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १९४५)

१९९४: केन्द्रीय मंत्री सरदार स्वर्ण सिंग यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १९०७)

१९९६: लेखक, पत्रकार प्रभाकर नारायण ऊर्फ भाऊ पाध्ये यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १९२६)

१९९८: लेखक व दिग्दर्शक विश्राम बेडेकर यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १९०६)

२००५: भारतीय राजकारणी शम्मीशेर सिंह शेरी यांचे निधन.

२०११: उद्योगपती अरविंद मफतलाल यांचे निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १९२३)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.10.2021-शनिवार.