म्हणी - "कानामIगून आली आणि तिखट झाली"

Started by Atul Kaviraje, October 30, 2021, 05:30:29 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "कानामIगून आली आणि तिखट झाली"

                                             म्हणी
                                          क्रमांक-65
                              "कानामIगून आली आणि तिखट झाली"
                            ------------------------------------


65. कानामIगून आली आणि तिखट झाली
    ----------------------------------

--मागून येऊन वरचढ होणे.
--एखाद्या गोष्टीत मागून येणे आणि श्रेष्ठ होणे.
--एखादया व्यवतीपेक्षा दुसरी व्यवती वयाने अगर अधिकाराने कमी असूनही दुसर्या व्यक्तीने अल्पावधीतच रयाच्यापेक्षा जास्त मानाची जागा काबीज करणे.
--मागून येऊन सुद्धा थोड्याच दिवसात वरचढ होणे.
--मागून येणाऱ्या व्यक्तीने आपल्यापेक्षा वरचढ होणे.
--शिंगे ही मागाहून फुटतात. कान हे उपजत असतात पण मागाहून येणारी शिंगे कानापेक्षां तीक्ष्ण टोकदार असून टोचतात. यावरून मागाहून येणार्‍या पण वरचढपणानें वागणार्‍या व्यक्तीला म्‍हणतात. 'हे कानामागुनि आले। शाहणे फारची झाले।' उघडितो तयांचे डोळे।'-संग्रामगीतें ४८.-रेंदाळकर कविता, खंड ३. चुकीचा पाठभेद-पानामागून आली, तिखट झाली (मिरची).
--To come back and prevail.


                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                 --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.10.2021-शनिवार.