म्हणी-"नाव मोठे लक्षण खोटे"

Started by Atul Kaviraje, October 31, 2021, 03:05:33 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "नाव मोठे लक्षण खोटे"


                                           म्हणी
                                         क्रमांक-66
                                   "नाव मोठे लक्षण खोटे"
                                 -----------------------

66. नाव मोठे लक्षण खोटे
    --------------------

--कीर्ती मोठी पण कृती छोटी.
--काही व्यक्ती फक्त नावाला प्रसिद्ध असतात.त्याचं खरं कर्तुत्व काही नसतं.
--#श्रीमंत असून कंजूष असणे, #श्रीमंत असण्याचा आव आणणे.
--कार्य मोठे पण प्रत्येक्ष कृती काहीच नाही.
--दिखावा मोठा, प्रत्यक्षात उलट परिस्थिती.
--कीर्ती मोठी असली तरी, कृती मात्र नावाला खोटेपणा आणणारी.

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                  ------------------------------------------

              नाव मोठे, लक्षण खोटे-कथा---

                   कर्तृत्वशून्य गृहस्थ---

     एक गृहस्थ नेहमीच मोठेपणाच्या गप्पा मारत असत. त्यांचा स्वभाव अतिशय घमेंडखोर होता. एकदा ते गृहस्थ आपल्या थोर पूर्वजांविषयी आणि आपल्या घराण्याविषयी खूप मोठ-मोठया गप्पा मारित होते आणि ते समोरच्या व्यक्तीच्या अगदीच सामान्य पूर्वजांविषयी तुच्छता दाखवीत होते.

     घमेंडखोर गृहस्थाचे ते बोलणे दुसऱ्या गृहस्थाने प्रथम थोडया वेळ अतिशय शांतपणे ऐकून घेतले व नंतर त्यांना म्हणाले, "तुम्ही बोलत आहात ते अगदी खरे आहे, तुमचे खापरपणजोबा, पणजोबा, आजोबा, वडील हे सर्वजण खूप थोर होऊन गेल्यामुळे, तुमचे घराणे हे थोर आहे, परंतु अशा त्या थोर घराण्यात जन्माला येऊन देखील तुम्ही मात्र अगदीच सामान्य आणि कर्तृत्वशून्य निघाले व त्यामुळे तुम्ही तुमच्या घराण्याच्या थोर परंपरेचा शेवट करून टाकला आहे."

     ते दुसरे गृहस्थ एवढे बोलून थांबले नाहीत तर पुढे अजून चिडून त्या गृहस्थांना म्हणाले, "याउलट माझे खापरपणजोबा, पणजोबा, आजोबा आणि वडील हे सर्वजण अगदी सामान्य होऊन गेले आहेत त्यामुळे माझा जन्म जरी त्या अतिसामान्य असलेल्या घराण्यात झाला, तरी देखील मी भगीरथ प्रयत्नांनी शिक्षण घेऊन एका महाविद्यालयाचा प्राचार्य झालो, इतकेच नाही, तर मी अनेक मौल्यवान ग्रंथ लिहून, मोठ-मोठया विव्दानांच्या प्रशंसेला पात्र ठरलो आहे व यामुळे मी माझ्या कर्तृत्वाने माझ्या अतिशय सामान्य घराण्याला असामान्यता प्राप्त करून दिले आहे.

     तेव्हा 'नाव मोठे व लक्षण खोटे' अशी तुमची अवस्था आहे आणि दिवस उगवला की तो कसातरी पुढे ढकलायचा एवढे काय ते तुम्हाला माहित असते म्हणून तुमच्यासारख्या अगदी सामान्य माणसाने, फक्त आपले पूर्वज मोठे म्हणून स्वतःला मोठे समजणे, हा निव्वळ मुर्खपणा नाही का? तेव्हा आता नुसते बोलणे बंद करा."

     दुसऱ्या गृहस्थाचे ते बोलणे ऐकून त्या घमेंडखोर माणसाचे डोळे खाडकन उघडले आणि त्यामुळे त्यांचे तोंड बंद झाले.

लेखिका-पूजा शिंदे
----------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीलेख.कॉम)
                    ------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.10.2021-रविवार.