"राष्ट्रीय एकता दिवस"-लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, October 31, 2021, 04:12:17 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "राष्ट्रीय एकता दिवस"
                                           लेख क्रमांक-2
                                     ----------------------

  मित्र/मैत्रिणींनो,

      आज दिनांक-३१.१०.२०२१-रविवार  आहे. आजचा दिवस "राष्ट्रीय एकता दिवस"या नावानेही ओळखला जातो. जाणून घेऊया, या दिवसाची संकल्पना, महत्त्व  व इतर माहिती.

     Sardar Vallabhbhai Patel-सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती, देशभरात रन फॉर युनिटीचं आयोजन.

     2014 पासून म्हणजेच मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळापासून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीला (31 ऑक्टोबर) राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जात आहे. या दिवशी देशभरात रन फॉर युनिटीचं आयोजन केलं जातं.

     India celebrates birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel as National Unity Day.

     'लोहपुरुष' सरदार पटेल यांची 144 वी जयंती आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे देशात ठिकठिकाणी रन फॉर युनिटीचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 'रन फॉर युनिटी'ला फ्लॅग ऑफ केला. दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममधून रन फॉर युनिटीला सुरुवात झाली.

     त्याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन श्रद्धांजली वाहिली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधील केवडियाला जाऊन 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' इथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला अभिवादन केलं. सोबतच पंतप्रधान एकता दिवस परेडमध्ये भागही घेणार आहे. तसंच टेक्नॉलॉजी डेमो साईटचा दौरा करतील आणि केवडियामध्ये सिव्हिल सर्व्हिस प्रोबेशनर्ससोबत बातचीत करणार आहेत.

     सरदार वल्लभभाई पटेल, राष्ट्रीय एकता दिवस, रन फॉर युनिटी, स्टॅच्यू ऑफ युनिटी, नरेंद्र मोदीऑक्टोबर महिन्यात पंतप्रधानांनी 'मन की बात'च्या माध्यमातून लोकांना 'रन फॉर युनिटी'मध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं.

     तर इकडे मुंबईतील नरिमन पॉईंट इथेही एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उपस्थित आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रन फॉर युनिटीला फ्लॅग ऑफ करण्यात आला.


                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.ए बी पी लाईव्ह.कॉम)
               ----------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.10.2021-रविवार.