कविता - महागाई

Started by कदम, November 01, 2021, 03:08:55 PM

Previous topic - Next topic

कदम

महागाई आली
महागाई आली
आता माञ
पंचायत झाली
कमी कमाई
जास्त खर्चाई
त्यावर भरीला
नुकसान भरपाई
महागाई महागाई
थोडी कमीहो ना गं बाई


महाग तांदुळ
महाग गहु
इकतरीचा फंडा
लईच अगाऊ
कामच काम
डोके दुखी
पोटात माञ
आतडी भुकी
महागाई महागाई
थोडी कमीहो ना गं बाई


महागाई समोर
नाही जमायचं तर
कशाला फांद्यात
धंद्यात पडायचं
धंदा वाढतो
वाढते कमाई
आता कोण
खावे त्यांचे
ज्यांना सर्वच
वाटतात भाई
महागाई महागाई
थोडी कमीहो ना गं बाई

- कुमार्कवी