चंद्र आहे साक्षीला....

Started by Rushi.VilasRao, November 01, 2021, 06:24:16 PM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

एकाकी अंधाऱ्या रातीला माझ्या....
तो चंद्र आहे साक्षीला....
उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न
सतावत मंतरलेल्या रातीला....
रोज पहाटे पळत जावून उठव झोपेतून सूर्याला....
पळता पळता रोज सकाळी घाल गवसणी यशाला....
हरवायच मला कोणाला नाही....
जिंकवायचय मला स्वतः ला....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
उग झालाय जन्म म्हणून जगायचं नाही....
द्यायचाय अर्थ जन्माला....
अभ्यास सातत्याने करत रहा....
आत्म-परीक्षण करत करत सुधार स्वतः च्या चुकांला...
निळ्या नभिचा चंद्र जसा....
चांदणीची त्याला साथ आहे....
रोज नित्य नियमाने अभ्यास करत चिकाटीने झटत रहा....
एक दिवस नक्कीच तुझं स्वप्न सत्यात उतरणार आहे...
जागून काढल्या कित्येक राता....
निळ्या नभीच्या चंद्राला माहीत आहे.....
पळताना आलेली पायाला फोड फक्त आईला माझ्या माहीत आहे.....
परीक्षेचा निकाल येणार उद्या म्हणून....
रात भर जगाला माझा बाप आहे.....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @Krushi_bhaijaan