म्हणी-"करावे तसे भरावे"

Started by Atul Kaviraje, November 01, 2021, 06:30:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "करावे तसे भरावे"

                                          म्हणी
                                       क्रमांक-67
                                    "करावे तसे भरावे"
                                   ------------------

67. करावे तसे भरावे
    -----------------

--जसे कृत्य असेल त्याप्रमाणे चांगले-वाईट फळ भोगावे लागते.
--संस्कृतपर्यायः - 1- यथा कर्म तथा फलम्। 2- कर्मायत्तं फलं पुंसाम्।
--आपण जी चांगली-वाईट कर्म करतो त्यांची फळं आपल्यालाच भोगावी लागतात.
--जसे कृत्य करणार त्याचप्रमाणे बरेवाईट फळ हि भोगणार.
--दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतातच.
--केलेल्या दुष्कृत्यास त्याप्रमाणात शिक्षा भोगण्यास तयार असावे.
--जसे कर्म केले असेल त्याप्रमाणे चांगले वा वाईट फळ मिळते.
--आपण जशी कृती  करू तशी तिची फळे आपल्या वाट्यास येतात.

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                  --------------------------------------------

                       जसे करावे तसे भरावे निबंध---

     अगदी साधी अशी म्हण असली तरी तिच्यात मोठा उपदेश भरलेला आहे. आपण जसे कार्य करू तसेच आपल्याला फळ मिळते जर आपण एखादे चांगले कार्य केले तर त्याचे आपल्यांना चांगले फळ मिळते. आपण जर एखादे वाईट कार्य केले तर आपल्यांना त्याचे वाईट परिणाम भोगायला मिळतात.

     कधी कधी परिणाम लवकर पाहायला मिळत नाही, जसे एखाद्याने चोरी केली आणि त्याला चोरी मध्ये खूप पैसे-सोने मिळाले, तर त्यला काही दिवस चेन मिळते. पण नंतर पोलीस तपासात शेवटी तो सापडतो व त्याची तुरंगात रवानगी होते, जसे करावे तसे भरावेच लागते हे ठरलेले आहे.

     संकेत ने परीक्षे साठी खूप अभ्यास केला पण हरी मात्र उनाडक्या करत राहिला, संकेत ला चांगले गुण मिळून तो उत्तीर्ण झाला व हरी नापास झाला. अर्थात असे होणारच संकेत ला त्याचे कष्टा चे फळ मिळाले.

     हे असे आहे म्हणूनच प्रत्येक मनुष्याने कोणतेही कार्य विचार्पृवक करावे कि ते चांगले आहे कि वाईट आहे. आपण करणाऱ्या कार्याचा परिणाम चांगला होईल कि वाईट त्याचा विचार करावा. अविचाराने कार्य करणे चांगले नाही.

     आपले पाप आणि पुण्य हे आपल्या वागणुकीवर अवलंबून असते असे अनेक धर्मग्रंथान मदे सांगितले आहे. ज्याने चांगले कार्य केले आहेत तो अधिक पुण्यवान आहे आणि जे वाईट कार्य करेल तो पापी आहे.

     मनुष्याने "करावे तसे भरावे " हि म्हण नेहमी डोळ्यापुढे ठेऊन वागावे कारण आपल्याला ह्या म्हणी चा अनुभव आपल्या आयुष्यात पदोपदी येतो. आपण एखाद्याला प्रेम दिले तर आपल्याला त्याच्या कडून प्रेम मिळते. जशी पेरणी तशी उगवणी. म्हणूच वेव्हारीक गोष्टी ह्या आपल्या वागणुकीवर अवलंबून असतात. आपण गोड तर सर्व जग गोड हे तसेच आहे. या वरूनच आपण सांगू शकतो जसे करावे तसे भरIवे हे खरे आहे.


                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी निबंध.इन)
                     -------------------------------------------

                         जसे करावे तसे भरावे कथा---

     एकदा एका राज्याचा राजा दुसऱ्या राजावर हल्ला करतो आणि त्याची सर्व संपती लुटून घेतो.त्याच्या राज्यावरही ताबा घेतो. नंतर तो युद्धातून आणलेली सर्व संपत्ती पत्र्याच्या पेट्यांमध्ये ठेवतो आणि त्या पेट्या राजमहालतील बागेत पुरून टाकतो.

     या युद्धात पराभूत राजाचा राजकुमार स्वतःची सुटका करून तेथून पळ काढतो. विजेत्या राजाने त्याला कधीच पाहिलेले नसते.

     या गोष्टीचा फायदा घेत राजकुमार संन्याशाचे रूप धारण करतो आणि विजेत्या राजाला भेटायला जाण्याचे निर्णय घेतो. तो आणि त्याचे अनुयायी राजाकडे येतात. विजेता राजा पराभूत राजकुमाराचे तेजस्वी आणि खान्दानी रूप पाहून त्याला चांगला पाहुणचार करतो. पाहुणा म्हणून त्याला राजेशाही वागणूक देतो.

     तेथे राहून तो आपल्या बुद्धी आणि शक्तीने खजिना कोठे पुरून ठेवला आहे हे शोधून काढतो. संधी सापडताच तो राजवाड्याच्या आवारातील बागेत पुरलेलं ते सारे धन घेऊन तेथून पळून जातो. जेव्हा राजाला त्याच्या खजिन्याच्या चोरीबद्दल समजते त्याला खूप दु:ख होते.

     तेव्हा त्याचा प्रधान म्हणतो महाराज आपण का दु:खी होता. जी संपत्ती आपली कधी नव्हतीच तिच्याबद्दल आपण का दु:ख बाळगत आहात. तेव्हा राजाला सत्य उमगते आणि तो दुखातून बाहेर पडतो.


                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.वेबदुनिया.कॉम)
                   ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.11.2021-सोमवार.