II शुभ दिवाळी II - "वसुबारस"

Started by Atul Kaviraje, November 03, 2021, 12:21:35 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                          II शुभ दिवाळी II
                                              "वसुबारस"
                                        --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     मित्रानो, दिवाळीची शुभ सुरुवात झाली आहे. दिनांक-०१.११.२०२१-सोमवार, रोजी वसुबारस हा सण साजरा केला गेला. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-कवयित्री बंधू-भगिनीस दिवाळीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, वसुबारस सण साजरा करण्याचे नियम व व्रत, पूजा-विधी व इतर महत्त्वाची माहिती.

             वसुबारस: सण साजरा करण्याचे नियम व विधी---

     आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. भरपूर कृषी उत्पादन व्हावे,आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.

                    असा साजरा करावा हा सण---

ह्या दिवशी संध्याकाळी गाय आणि वासरू ह्यांची पूजा करावी.
गायीच्या पायावर पाणी टाकावे.
गायीला हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ घालावी.
वासराची अश्या रीतीने पूजा करावी.
निरांजनाने ओवाळून घ्यावे.
गायीच्या अंगाला स्पर्श करावे.
गाय- वासराला गोडाचा नैवेद्य दाखवावा.
नंतर गायीला प्रदक्षिणा घालावी.
जवळपास गाय उपलब्ध नसल्यास घरी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय- वासराचे चित्र रेखावे व पूजा करावI.

                 या दिवसाचे काही नियम---

स्त्रिया या दिवशी दिवसभर उपास करतात.
ह्या दिवशी गहू, मूग खात नाही.
स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपास सोडतात.
या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत.
या दिवशी तव्यावर बनवलेले पदार्थही खात नाहीत.

     गायीप्रती कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो. स्त्रिया आपल्या मुला-बाळांच्या चांगल्या आरोग्यासाठी व सुख-समृद्धीसाठी ही पूजा करतात.


                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.वेबदुनिया.कॉम)
                     -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.11.2021-बुधवार.