"दिवाळी फटाक्यांच्या आतषबाजीने शोभतेय,कोरोनामुळे दिवाळीवर अंधार-सावट येतेय"

Started by Atul Kaviraje, November 03, 2021, 12:28:52 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                        विषय :यंदाची  दिवाळी  फटाक्याविना
                                 वास्तव  कोरोना  चारोळ्या
"दिवाळी फटाक्यांच्या आतषबाजीने शोभतेय,कोरोनामुळे दिवाळीवर अंधार-सावट येतेय"
-------------------------------------------------------------------------   

(1)
आली  "दिवाळी" , आली  "दिवाळी"
मंगल  पहाट , प्रकाशमान  झाली
पणत्या  दिव्यांची  आरास  सजली ,
"फटाक्यांची आतषबाजीची"  माळ  लावली .

(2)
"कोरोनाने  दिवाळीवर"  संक्रांतच  आणलीय
"दिवाळी"  घरच्या -घरीच  साजरी  होतेय
सोशल  डिस्टंसिंगचे  बंधन  येत ,
फोनवरच  शुभेच्छांचे  आदान -प्रदान  होतेय .

(3)
"फटाक्यांवर"  सरकारने  आणलीय  बंदी
प्रदूषणाची  त्यामुळे  होतेय  नांदी
भंगही  होतेय  यास्तव  शांती ,
"कोरोना"  रुग्णांची  वाढतेय  याने  भीती .

(4)
"फटाक्यांचा"  आवाज  नाही , "दिवाळीचा"  गजर  नाही
मुलांचे  खेळणे  नाही , त्यांचा  गलबला  नाही
सुनी  सुनी  वाटतेय  आजची  "दिवाळी" ,
अशी  "दिवाळी"  पाहण्याची  प्रथमच  येतेय  पाळी .

(5)
अंधारा  उजळून  टाकणारी  ती  "दिवाळी"
प्रकाश -बाणाने  अस्मान  उजळणारी  ती  "दिवाळी"
फुलबाज्या -वलयाने  प्रकाश -रिंगण  घालणारी  "दिवाळी" ,
रयाच  गेलीय  यंदा  "दिवाळीची"  सगळी .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.11.2021-बुधवार.