अंगणी हरवले बालपण !!

Started by Ashok_rokade24, November 03, 2021, 03:58:46 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

अंगणी हरवले बालपण गवसले नाही ,
होते लाचार की निरागस उमगले नाही ॥

ऊधान आनंदाचे दिव्यांची रोशनाई,
अंधारी एकला सोबती कुणी नाही,
सुगंध मिष्टान्नाचा  मन सैर होई  ,
क्षुधेने व्याकुळ जीव घास मायेचा नाही ॥

अंग झाकले नित नवनविन वस्त्रांनी ,
गंध नव्याचा कधी तो कळला नाही ,
पाटीवर अक्षरे गिरवली किती ,
अर्थ अक्षरांचा अजून उमजला नाही ॥

तुटे बंध लाचारीचे बळआले पंखी ,
मन हे गगनी नित झेप घेत राही ,
गाठली ऊंची जरी कितीही सुखाची ,
परि हरवले जे माझे गवसले नाही ॥

अशोक मु. रोकडे .
मुंबई .