"०३ नोव्हेंबर – दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, November 03, 2021, 11:31:55 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.११.२०२१-बुधवार .जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                     "०३ नोव्हेंबर – दिनविशेष"
                                    ------------------------


अ) ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या घटना.
    ----------------------------

१८१७: कॅनडातील सर्वात जुनी चार्टर्ड बँक बँक ऑफ मॉन्ट्रियल सुरु झाली.

१८३८: टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राचे द बॉम्बे टाईम्स अण्ड जनरल ऑफ कॉमर्स म्हणून मुंबई मध्ये पहिले प्रकाशन.

१९०३: पनामा देश कोलंबियापासुन स्वतंत्र झाला.

१९११: शेवरोलेट ऑटोमोबाइल कंपनी सुरु झाली.

१९१३: अमेरिकेत आय कर सुरू झाला.

१९१८: पोलंड देश रशियापासुन स्वतंत्र झाला.

१९४४: भारतीय संगीत प्रचारक मंडळातर्फे पुण्यात अखिल भारतीय संगीत परिषदेस सुरुवात.

१९४९: वाढत्या किमती विरुद्ध निषेध व्यक्त करण्याकरता पुण्यात बाराशे स्त्रियांचा कलेक्टर कचेरीवर मोर्चा.

१९५७: रशियाच्या स्पुटनिक-२ या अंतराळयानातून गेलेली लायका नावाची कुत्री ही अंतराळभ्रमण करणारी पहिली सजीव ठरली. मात्र प्रक्षेपणानंतर काही तासांतच ती मृत्यूमुखी पडली.

१९८८: श्रीलंकेतून आलेल्या भाडोत्री तामिळ सैनिकांनी मालदीववर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले.

२०१४: वन वर्ल्ड ट्रेड सेंटर अधिकृतपणे सुरु झाले.

=========================================

ब) ३ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म.
   --------------------------

१६८८: अम्बर संस्थानचे राजा सवाई जयसिंग (दुसरे) यांचा जन्म. (मृत्यू: २१ सप्टेंबर १७४३)

१९००: अॅडिडास चे संस्थापक एडॉल्फ डॅस्लर यांचा जन्म. (मृत्यू: ६ सप्टेंबर १९७८)

१९०१: दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते, रंगमंच आणि सिनेकलावंत व राज्यसभा सदस्य पृथ्वीराज कपूर यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे १९७२)

१९१७: भारतीय स्वतंत्रसैनिक अन्नपूर्णा महाराणा यांचा जन्म. (मृत्यू: ३१ डिसेंबर २०१२)

१९२१: अमेरिकन अभिनेते चार्ल्स ब्रॉन्सन यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट २००३)

१९२५: प्रबंधलेखक, संपादक डॉ. हे. वि. इनामदार यांचा जन्म.

१९३३: नोबेल पुरस्कार प्रमाणित मा. अमर्त्य सेन यांचा जन्म.

१९३७: चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देणार्‍या लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे १९९८)

=========================================

क) ३ नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यू.
   --------------------------

१८१९: शाहीर अनंत फांदी यांचे निधन.

१८९०: स्विस नॅशनल कौन्सिलचे पहिले अध्यक्ष ओरिचिक ओशेनेबेविन यांचे निधन. (जन्म: २४ नोव्हेंबर १८११)

१९७५: बांगलादेशाचे पहिले पंतप्रधान ताजुद्दीन अहमद यांचे निधन. (जन्म: २३ जुलै १९२५)

१९९०: लोकप्रिय चरित्र अभिनेते मामोहन कृष्ण यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १९२२)

१९९२: हिंदी चित्रपटसृष्टीतील नायक व खलनायक प्रेम नाथ यांचे निधन. (जन्म: २१ नोव्हेंबर १९२६)

१९९८: कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. सी. हिरेमठ यांचे निधन. (जन्म: १५ जानेवारी १९२०)

१९९८: बॅटमॅन पत्राचे निर्माते बॉब केन यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १९१५)

२०००: चीनविषयक तज्ञ आणि पूर्व आशियाई घडामोडींचे अभ्यासक प्रा. गिरी देशिंगकर यांचे निधन.

२०१२: गुजरातचे राज्यपाल कैलाशपती मिश्रा यांचे निधन. (जन्म: ५ ऑक्टोबर १९२३)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.11.2021-बुधवार.