"०४ नोव्हेंबर – दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, November 04, 2021, 03:35:58 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०४ .११.२०२१-गुरुवार. जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                    "०४ नोव्हेंबर  – दिनविशेष"
                                    ------------------------


अ) ४ नोव्हेंबर रोजी झालेल्या घटना.
    ----------------------------

१८९६: पुण्यात डेक्कन सभेची स्थापना.

१९१८: पहिले महायुद्ध – ऑस्ट्रिया व हंगेरीने इटलीसमोर शरणागती पत्करली.

१९२१: जपानचे पंतप्रधान हारा ताकाशी यांची टोकियो येथे हत्या.

१९२२: तुतनखामेन राजाच्या प्रसिद्ध पिरॅमिडमधील कबरस्थानाचे मुख्य द्वार शोधण्यात यश.

१९४८: डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असणाऱ्या घटना समितीने घटनेचा मसुदा सादर केला.

१९९६: कलागौरव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा नाट्यगौरव पुरस्कार डॉ. श्रीराम लागू व सत्यदेव दुबे यांना जाहीर

२०००: हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतातील असामान्य कामगिरीबद्दल गायक पं. भीमसेन जोशी यांना आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार जाहीर.

२००१: हॅरी पॉटर अण्ड फिलॉसॉफर्स स्टोन या चित्रपटाचा लंडन येथे प्रिमियर.

२००८: बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले.

=========================================

ब) ४ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म.
   --------------------------

१६१८: मुघल सम्राट औरंगजेब याचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १७०७)

१८४५: भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचे एक आद्य प्रवर्तक वासुदेव बळवंत फडके यांचा शिरढोण जि. कुलाबा, रायगड येथे जन्म. (मृत्यू: १७ फेब्रुवारी १८८३)

१८७१: मानववंशशास्त्रज्ञ शरदचंद्र रॉय यांचा जन्म.

१८८४: प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते जमनालाल बजाज यांचा जन्म. (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९४२)

१८८४: ट्रॅक्टरचे निर्माते हॅरी फर्ग्युसन यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर १९६०)

१८९४: कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: १० मार्च १९७१)

१८९७: भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ जानकी अम्माल यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी १९८४)

१९१६: बार्बी बाहुलीच्या निर्मात्या रुथ हँडलर यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल २००२)

१९२५: चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक ऋत्विक घटक यांचा जन्म. (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९७६)

१९२९: शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीतील संगीतकार जयकिशन डाह्याभाई पांचाळ यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९७१)

१९२९: गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला शकुंतलादेवी यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल २०१३)

१९३०: भारतीय औषधीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक रंजीत रॉय चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर २०१५)

१९३४: दिग्दर्शिका विजया मेहता यांचा जन्म.

१९५०: व्हर्जिन ग्रुपचे सहसंस्थापक निग पॉवेल यांचा जन्म.

१९५५: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अल्हाज मौलाना घोसी शाह यांचा जन्म.

१९७१: अभिनेत्री तब्बू यांचा जन्म.

१९८६: भारतीय उद्योजक सुहास गोपीनाथ यांचा जन्म.

=========================================

क) ४ नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यू.
    --------------------------

१९७०: लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक पं. शंभू महाराज यांचे निधन.

१९९१: प्राच्य विद्या संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पाली भाषा कोविद, सिंहली, ब्राम्ही व थाई भाषा तज्ञ पुरुषोत्तम विश्वनाथ तथा पु. वि. बापट यांचे निधन. (जन्म: १२ जून १८९४)

१९९२: मोटर-व्हीलचेअरचे निर्माते जॉर्ज क्लाईन यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९०४)

१९९५: इस्त्रायलचे ५ वे पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि नोबेल पारितोषिक विजेते यित्झॅक राबिन यांचे निधन. (जन्म: १ मार्च १९२२)

१९९८: हिंदी कवी नागार्जुन यांचे निधन.

१९९९: वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू माल्कम मार्शल यांचे निधन. (जन्म: १८ एप्रिल १९५८)

२००५: इतिहासकार, वृत्तपत्रकार,कोशकार स. मा. गर्गे यांचे पुणे येथे निधन झाले.

२०११: नाटककार व साहित्यिक दिलीप परदेशी यांचे निधन.

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.11.2021-गुरुवार.