II शुभ दिवाळी II-"नरक चतुर्दशी"

Started by Atul Kaviraje, November 04, 2021, 05:54:47 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                          II शुभ दिवाळी II
                                            "नरक चतुर्दशी"
                                         ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०४.११.२०२१-गुरुवार आहे. शुभ दिवाळीची सुरुवात झाली आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-कवयित्री बंधू-भगिनीस दिवाळीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. आजचा मंगलमय दिवस  म्हणजे "नरक चतुर्दशी". वाचूया, या दिनाचे महत्त्व, माहिती, पूजा विधी, व्रत, आणि इतर महत्त्वाची माहिती.

     आश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशीला नरक चतुर्थी साजरी केली जाते. नरकासुर राक्षसाच्या वधाप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. यामागील कहाणी अशी आहे की नरकासुर नावाचा असुर मानवांना पीडा देत होता तेव्हा श्रीकृष्णाने त्याचा वध केला. मरताना नरकासुराने वर मागितला, की आजच्या तिथीला मंगल स्नान करणार्‍याला नरकाची पीडा होऊ नये. श्रीकृष्णाने त्याला वर दिला. त्यामुळे नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करण्याची रीत पडली. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून जे लोक स्नान करत नाहीत, वर्षभर त्यांच्या मागे दारिद्र्य आणि संकट पाठ सोडत नाही, असे मानले जाते.

                 अभ्यंगस्नान---

     चंद्रोदयव्यापिनी चतुर्दशीला सकाळीच लवकर उठून शरीरावर तेल आणि उटणे लावून स्नान करावे. त्यावेळी खालील मंत्र म्हणावा.

'यमलोकदर्शनाभावकामोऽअभ्यंगस्नान करिष्ये।'

अर्धी आंघोळ झल्यावर आंघोळ करणार्‍याला औक्षण करावे.
या दिवशी गव्हाच्या पिठाचा एक दिवा तयार करून त्यात तिळाचे तेल टाकून, दिव्याच्या चारही बाजूला कापसाची वात लावून दिवा प्रज्वलित करावा. त्यानंतर पूर्वेला तोंड करून अक्षता आणि फुलांनी पूजा करावी. त्यासाठी खालील मंत्र बोलून देवालयात दिवा लावा.

'दत्तो दीप: चतुर्दश्यां नरक प्रीतये मया।।
चतु : वर्ती समायु सर्वपापापनुत्तये।।'

संध्याकाळी घर, दुकान, कार्यालय आदी प्रज्वलित दिव्यांनी अलंकृत करा.

हे व्रत केल्यावर नरकापासून मुक्ती मिळते. रामभक्त हनुमानाचा जन्म याच दिवशी झाला होता.

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ मराठी.वेबदुनिया.कॉम)
                    -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.11.2021-गुरुवार.