"०५ नोव्हेंबर – दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, November 05, 2021, 03:11:31 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०५.११.२०२१ -शुक्रवार .जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                    "०५ नोव्हेंबर – दिनविशेष"
                                    ------------------------


अ) ५ नोव्हेंबर रोजी झालेल्या घटना.
    ----------------------------

१८१७: इंग्रज व दुसरे बाजीराव यांच्या लढाईत इंग्रजांकडून बाजीरावाच्या सैन्याचा पराभव झाला.

१८२४: अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात जगातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले.

१८४३: विष्णुदास अमृत भावे स्वरचित सीता स्वयंवर या मराठीतील पहिल्या नाटकाचा पहिला प्रयोग सांगली येथे सदर केला.

१८७२: महिलांना मतदानाचा अधिकार नसताना अमेरिकेत सुसान अँथनी या महिलेने मतदान केल्यामुळे तिला १०० डॉलर दंड करण्यात आला.

१८९५: जॉर्ज बी. सेल्डेन यांना ऑटोमोबाइलसाठी पहिले अमेरिकेचे पेटंट भेटले.

१९२९: जी. आय. पी. रेल्वे कंपनीने मुंबईहून पुण्यापर्यंतच्या लोहमार्गावरून आगगाड्याऐवजी विजेवर चालणा-या गाड्यांचा प्रारंभ केला.

१९४०: फ्रँकलिन डी. रूझवेल्ट हे तिसऱ्यांदा निवडून आलेले. एकमेव राष्ट्रपती आहेत.

१९४५: कोलंबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९५१: बी. बी. सी. आय. (Bombay Baroda and Central India) रेल्वे आणि सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे, जयपूर रेल्वे व कच्छ रेल्वे यांचे विलिणीकरण करुन पश्चिम रेल्वे ची स्थापना करण्यात आली.

२००६: इराकचे माजी अध्यक्ष सद्दाम हुसेन यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

२००७: गुगलने ने अॅडरॉइड मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमचे अनावरण केले.

२०१३: भारताने मंगळ ऑर्बिटर मोहिमेची सुरूवात केली.

=========================================

ब) ५ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म.
   --------------------------

१८७०: स्वातंत्र्य चळवळीतील नेते चित्तरंजन दास यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९२५)

१८८५: अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ विल डुरांट यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९८१)

१८९२: इंग्रजी-भारतीय अनुवांशिक आणि जीवशास्त्रज्ञ जे. बी. एस. हलदाणे यांचा जन्म. (मृत्यू: १ डिसेंबर १९६४)

१९०५: भारतीय लेखक आणि कवी सज्जनद झहीर यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९७३)

१९०८: तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व लेखक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रा. राजा राव यांचा जन्म. (मृत्यू: ८ जुलै २००६ – ऑस्टिन, न्यू जर्सी, यु. एस. ए.)

१९१३: ब्रिटिश अभिनेत्री विवियन लेह यांचा जन्म. (मृत्यू: ८ जुलै १९६७)

१९१७: स्वातंत्र्यसैनिक व हरयाणाचे मुख्यमंत्री बनारसी दास गुप्ता यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट २००७)

१९२१: ललित कलादर्श ह्या नाट्यसंस्थेचे प्रमुख व संगीत नाटक कलावंत व गायक भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म.

१९२९: गीतकार व सर्जनशील कवी प्रा. योगेश्वर अभ्यंकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर २०००)

१९३०: भारतीय नेते अर्जुनसिंह यांचा जन्म. (मृत्यू: ४ मार्च २०११)

१९३२: पक्षी, वन्याजीवनविषयक ग्रंथकार मारुती चितमपल्ली यांचा सोलापूर येथे जन्म.

१९५२: भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक वंदना शिवा यांचा जन्म.

१९५५: पत्रकार करन थापर यांचा जन्म.

१९८८: क्रिकेटपटू विराट कोहोली यांचा जन्म.

=========================================

क) ५ नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यू.
    --------------------------

१८७९: प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनलेला असतो असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक व गणितज्ञ जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांचे निधन. (जन्म: १३ जून १८३१ – एडिंबर्ग, यु. के.)

१९१५: राष्ट्रीय सभेचे संस्थापक व मुंबईचा सिंह उर्फ फिरोजशहा मेरवानजी मेहता यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १८४५)

१९५०: चतुरंग गवई फय्याझ खाँसाहेब यांचे निधन.

१९९१: कथालेखिका व कादंबरीकार शकुंतला विष्णू गोगटे यांचे निधन.

२०११: संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांचे निधन. (जन्म: ८ सप्टेंबर १९२६)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.11.2021-शुक्रवार.