II शुभ दिवाळी II - "भाऊबीज "- लेख क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, November 06, 2021, 12:13:17 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                           II शुभ दिवाळी II
                                               "भाऊबीज "
                                              लेख क्रमांक-१
                                         -------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.११.२०२१-शनिवार आहे. शुभ दिवाळीची सुरुवात झाली आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-कवयित्री बंधू-भगिनीस दिवाळीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. आजचा मंगलमय दिवस  म्हणजे "भाऊबीज ". वाचूया, या दिनाचे महत्त्व, माहिती, आणि इतर महत्त्वाची माहिती.

     दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज असते. तसेही दिवाळी हा सण आला म्हणजे आपल्या बहिणीला किंवा सासरी गेलेल्या मुलीला आपल्या घरी दिवाळीला आणण्याची प्रथा असते. म्हणून बहीण भाऊ यांचा सण म्हणजेच भाऊबीज. भाऊबीज हिंदूधर्मीय आहे. हा कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच हा महाराष्ट्रीय पद्धतीच्या सहाव्या दिवशी असतो.

===================
भाऊबीज सणाची संपूर्ण माहिती
भाऊबीज सणाचे महत्व
भाऊबीज कशी साजरी करतात
भाऊबीज विषयी एक पौराणिक कथा
===================

     या दिवशी बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. मग भाऊ ताटात ओवाळणी देऊन बहिणीचा सत्कार करत असतो. काही समाजाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन चित्रगुप्ताची पूजा करतात.

     या दिवशी यमराजाने आपली बहिण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रालंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले. म्हणून हा दिवस यमद्वितीया म्हणून साजरा केला जातो. या दिवशी नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. असे केल्याने त्याला त्यावर्षी यमापासून भय नसते असा समज आहे. यम आणि यमी या भावा-बहिणीच्या प्रेमाबद्दल हा दिवस साजरा केला जातो.

     भाऊबीज हा सण संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो तसेच हा सण रक्षाबंधन इतकाच महत्त्वाचा सण आहे. भाऊबिजेचा हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. उत्तर भारतात, नेपाळमध्ये भाई दूज आणि भाई टीका असेही म्हणतात. या सणाला हे नाव नेमले गेले. त्याचे महत्त्वही तसेच आहे. म्हणजेच बंधू-भगिनी मधील श्वासात बंधन करणारा हा सण आहे. हा सण भावाच्या दीर्घायुष्या -साठी व त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणारा दिवस आहेत.

                      भाऊबीज सणाचे महत्व---

     भाऊबीज साजरा करण्यामागे आपल्या दोन बहीण आणि भावाचे प्रेमाचे महत्त्व आपल्याला येथे दिसून येते. कार्तिक शुद्ध द्वितीया भाऊबीज हा सण साजरा केला जातो. बहिण आपल्या भावाला ओवाळून त्याच्या दिर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. हा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीया चंद्र, आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा बीजेच्या कोरीप्रमाणे बंधू प्रेमाचे वर्णन होत राहो ही त्यामागची भूमिका आहे.

     आपल्या मनातील द्वेष निघून सर्वत्र बंधू भावनेची कल्पना जागृत होते. म्हणून त्याकरिता भाऊबीजेचा हा सण साजरा केला जातो. बंधू-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. ज्या समाजात भगिनींना समाजातील व राष्ट्रातील पुरुष वर्ग भगिनी समजून त्यांच्या रक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना अभय देतील व त्यामुळे त्या समाजात निर्भयतेने फिरू शकतील. तो दिवस म्हणजे दीपावलीतील भाऊबीज पूजनाचा दिवस असतो.

     या दिवशी असे म्हणतात, की स्त्रियांमध्ये देवीतत्त्व जागृत होतं. अशा परिस्थितीत बहिणीच्या सानिध्यात राहण्याने तिच्या हाताने बनवलेले पदार्थ खाल्ल्याने आणि तिच्याकडून ओढवून घेतल्याने भावाला व्यवहारिक आणि आध्यात्मिक लाभ प्राप्त होतो. तसेच एखाद्या कोणत्या कारणामुळे बहिणीला कोणी भाऊ भेटलाच नाही, तर ती चंद्राला भाऊ समजून ओवाळते. भावा-बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी विचारपूस करावी एकमेकांवर प्रेम करावे यासाठी हे आपल्याला महत्त्व दिसून येते.

--प्रमोद तपासे
-------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीमोल.कॉम)
                      -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.11.2021-शनिवार.