II शुभ दिवाळी II - "भाऊबीज "- लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, November 06, 2021, 12:15:46 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                         II शुभ दिवाळी II
                                             "भाऊबीज "
                                            लेख क्रमांक-2
                                       -------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.११.२०२१-शनिवार आहे. शुभ दिवाळीची सुरुवात झाली आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-कवयित्री बंधू-भगिनीस दिवाळीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. आजचा मंगलमय दिवस  म्हणजे "भाऊबीज ". वाचूया, या दिनाचे महत्त्व, माहिती, आणि इतर महत्त्वाची माहिती.

                   भाऊबीज कशी साजरी करतात---

     भाऊबीजेच्या दिवशी भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जातो. त्या दिवशी बहिणीने वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ जसे की लाडू, करंजी, गुलाबजामून, चकली, चिवडा हे सर्व दिवाळीसाठी केलीच असतात. त्या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी गेल्यानंतर संध्याकाळी एका पाटावर बसवून दिवा, हळद-कुंकू, अक्षीद यांनी सजवलेले ताट घेऊन आधी चंद्राला व नंतर आपल्या भावाला ओवाळते व दहीभाताचा नैवद्द चंद्राला दाखविला जातो.

     आपल्या भावाला गोड पदार्थांचे जेवण वाढते. अशा प्रकारे हा सण मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करतात. भाऊबीज म्हणजे बहिण भावाच्या प्रेमळ नात्याचा उत्सव असतो. दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज हा सण असतो. भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याची पूजा करत असते. भावाची पाषाणापासून म्हणजेच मृत्यू पासून सुटका व्हावी व दीर्घायुषी व्हावा यामागे हा खरा उद्देश असतो .

     भाऊ आपल्या यशाशक्ती प्रमाणे पैसे, कापड, दागिने अशा विविध वस्तू देत असतो. या दिवशी सख्खा किंवा दूरचा भाऊ नसल्यास चंद्राला सुद्धा ओवाळण्याची पद्धत आहे. अशाप्रकारे बहिण-भावाचा हा भाऊबीज सण महिला खूप मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करतात.

     भाऊबीज साजरी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असल्या तरी यामध्ये आपली बहीण भावाला ओवाळत असते. या दिवशी भावाला तेल उटणे लावून अंघोळ घालतात. बहिणी भावाच्या आवडीचे सर्व पदार्थ तयार करतात. एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर ती चंद्राला आपला भाऊ म्हणून ओवाळते.

     भावाने बहिणीकडे जाऊन बहिणीने भावाला ओवाळावे तसेच भाऊबीजेच्या दिवशी कुठल्याही पुरुषाने स्वतःच्या घरी पत्नीच्या हातचे अन्न खायचे नसते, त्याने बहिणीच्या घरी जावे आणि तिला वस्त्रालंकार वगैरे देऊन तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहीण नसली तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे असे सांगितले जाते.

     भारतात तसेच हिंदू धर्मातील सर्व बहिणी, महिला भाऊबीज साजरी करत असतात. यामध्ये त्यांना एक वेगळाच आनंद मिळतो. भाऊबीजेला बहिणीने भावाला टिळा लावून त्याला ओवाळणी करत असतात. त्यानंतर बहिणी भावाच्या हाताला लाल धागा बांधतात व नंतर काही गोड खायला देतात. अशा प्रकारे बहिण-भावाचा हा प्रेमळ सण साजरा केला जातो.

                  भाऊबीज विषयी एक पौराणिक कथा---

     भाऊबीज विषयी एक यम आणि त्याची बहीण यमी या दोन बहिण भावाची एक कथा प्रचलीत आहे. यमद्वितीया यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो. त्यामुळे त्या दिवशी नरकात खितपत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे करतो. त्यामुळे भाऊबीजेला एक वेगळेच महत्त्व आलेला आहे. एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर तिने कोणत्याही पुरुषाला आपला भाऊ मानून ती त्याला ओवाळते. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळण्याची पद्धत आहे.

     अपमृत्यु येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्थी आणि मृत्यूची देवता यम याचे पूजन करून त्याच्या चौदा दिव्यानी तर्पण करण्यास सांगितले आहे, असे केल्यास अपमृत्यु येत नाही. म्हणून बहिण या दिवशी आपल्या भावाला आपल्या घरी बोलावून स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून गोडधोड पदार्थ करून त्याला ओवाळूनी केल्यानंतर जेवू घालते व देवाकडे प्रार्थना करते की, माझ्या भावाला सर्व संकटांपासून तसेच यमापासून कोणतीही भय राहू देत नाही.

--प्रमोद तपासे
-------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीमोल.कॉम)
                     ------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.11.2021-शनिवार.