"आदर्श शासनकर्ता व सहिष्णू राजा" - "छत्रपति शिवाजी महाराज"

Started by Atul Kaviraje, November 06, 2021, 03:03:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "आदर्श शासनकर्ता व सहिष्णू राजा"
                                      "छत्रपति शिवाजी महाराज"
                                            "सुविचार व नारे "
                               ----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     "महापुरुष आणि थोर विचारवंतांचे मार्गदर्शक विचार" या मालिके-अंतर्गत आज ऐकुया, "छत्रपति शिवाजी महाराज" यांचे अनुभवी, थोर, आणि मार्ग-दर्शक विचार ( विचार पुष्प क्रमांक-50)

     छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०), मराठी साम्राज्याचे संस्थापक उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता , सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटवला. मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्‍यांमधे अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. आदिलशाही, निजामशाही आणि मुघलसाम्राज्य बलाढ्य असली तरी महाराष्ट्रात त्यांची सगळी भीस्त स्थानिक सरदारांवर आणि किल्लेदारांवर होती. ते सरदार/ किल्लेदार जनतेवर अन्याय-अत्याचार करत असत. शिवाजीमहाराजांनी त्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली, आणि उत्तम शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले.

                            " मार्गदर्शक विचार पुष्प क्रमांक-50 "
                           ----------------------------------

--"अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी, उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती, तरी मूर्ती दिसेल शिवरायांची..जय शिवराय !"


                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-सुविचारमराठी.कॉम)
                   ---------------------------------------------
       

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.11.2021-शनिवार.