म्हणी-"कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ"

Started by Atul Kaviraje, November 06, 2021, 03:38:45 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ"

                                            म्हणी
                                         क्रमांक-70
                               "कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ"
                             ------------------------------


70. कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ
     ---------------------------

--आपलाच माणूस आपल्या नाशाला कारणीभूत होतो.
--फ़क्त स्वार्थासाठी दुष्ट बुद्धीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचा तोटा करणे.
--आपल्या जातभाईंचे नुकसान होणे.
--आपल्याच माणसाचे आपल्या हातून वाईट होणे.
--आपलाच प्रिय आपल्या नाशाला कारणीभूत ठरत असतो.
--आपलाच मनुष्य आपल्या नुकसानीला कारणीभूत होणे.
--स्वार्थासाठी शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचे नुकसान करणे .
--फ़क्त स्वार्थासाठी दुष्ट बुद्धीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचा तोटा करणे.
--दुसऱ्यांना इजा करताना आपल्यालाही इजा होऊ शकते.
--यात काळ म्हणजेच मृत्यू किंवा नाश, आणि गोत म्हणजेच गणगोत(आपण ज्या परिवारातून, समाजातून येतो ते). ... म्हणूनच कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ असे म्हटले जाते. यात काळ म्हणजेच मृत्यू किंवा नाश, आणि गोत म्हणजेच गणगोत(आपण ज्या परिवारातून, समाजातून येतो ते).
--कुर्‍हाडीचा दांडा हा लाकडाचा केलेला असतो व त्‍या कुर्‍हाडीने लाकूडतोड्या सर्व लाकडे तोडून टाकतो. यावरून एखादा मनुष्‍य स्‍वजनांस घातक झाल्‍यास त्‍याबद्दल ही म्‍हण योजतात.कुर्‍हाडीचा दांडा लाकडाचा केलेला असतो पण तोच आपल्‍या जातभाईंना-लाकडांना कापण्यास, फोडण्यास तयार होतो. (ल.) निमकहराम घरबुडव्या कुलशत्रु. ''त्‍या शूराच्या (धनाजीच्या) पोटी हा मंगलनिधि चंद्रसेन उत्‍पन्न झाला आणि स्‍वराज्‍याशी निमकहरामीपणा करून 'कुर्‍हाडी०' झाला.''-बाजी० ''जो बाटतो तो 'कुर्‍हाडीचा०' असे होऊन आपल्‍या जातीबांधवांना पाहिजे तसे बोलतो, नांवे ठेवितो, व त्‍यांची वर्मेकर्मे बाहेर काढतो.''-आजोच १७२. तु०-नष्‍टनय कसा झाला दितिसुतचंदनवनांत हा बाळ। कंटकतरु, व्हायाला तच्छेदक विष्‍णुपरशुला नाळ।। -मो मंत्रभागवत ७.४५.
--स्वार्थासाठी शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचे नुकसान करणे.
--वाक्य वापर : नक्षलवादी विभागांमधील अनेक ग्रामस्थ भितीपोटी कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळप्रमाणे नक्षलवाद्यांना मदत करतात.
--Your loved one is the cause of your destruction.

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                   --------------------------------------------

                      कविता (तुकाटिका) - एक वादळवाट---


कुर्‍हाड
कुऱ्हाडीचा दांडा
गोतास काळ
आजून किती दिवस
मारून न्यायची वेळ!
कुर्‍हाड कोसळल्यानंतर कळेल,
दांडा आणि कुर्‍हाड
यांचा काय दोष?
गुन्हा तर
त्या हाताचा आहे.
जो चालला
गोञावर, प्राणीमाञांवर!
कळेल ते टळेल का?
दांडा वेगळा,
कुर्‍हाड मोकळी
माणसे जोडून माणसास,
मानवतेची करून साखळी
घरात आणि घराबाहेर
समतेच्या वाटेवर
पाऊल एक
पडेल का?
काळ वाईट येण्यापूर्वी
माणसास माणूस खाण्यापूर्वी
विचार पेटवा मनीचा
जीवन खेळ झणीचा
संकटात आहे, संकेत आहे निसर्गाचा
तुका म्हणे शहाणे जग शहाणे सारे जन
क्षणभंगुर आयुष्यात ऐक्य एकता म्हण!

--श्री. टी एस क्षीरसागर
---------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-फेसबुक.कॉम)
                       ---------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.11.2021-शनिवार.