"०८ नोव्हेंबर – दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, November 08, 2021, 10:56:02 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०८.११.२०२१-सोमवार.जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                    "०८ नोव्हेंबर – दिनविशेष"
                                  --------------------------


अ) ८ नोव्हेंबर रोजी झालेल्या घटना.
   -----------------------------

१८८९: मोंटाना हे अमेरिकेचे ४१ वे राज्य बनले.

१८९५: दुसराच एक प्रयोग करत असताना विल्हेम राँटजेन यांना क्ष किरणांचा शोध लागला.

१९३२: अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक संघाच्या महाराष्ट्र शाखेची स्थापना.

१९३९: म्युनिक येथे अ‍ॅडॉल्फ हिटलर प्राणघातक हल्ल्यातुन बचावला.

१९४७: पंजाब अँड हरयाणा उच्‍च न्यायालयाची स्थापना.

१९६०: अटीतटीच्या लढतीत रिचर्ड निक्सन यांचा पराभव करुन जॉन एफ. केनेडी अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष बनले.

१९८७: पुणे मॅरेथॉनचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन. पुणे मॅरेथॉन ही स्पर्धा खासदार सुरेश कलमाडी यांनी सुरु केली.

१९९६: कवी व लेखक प्रा. माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांची विदर्भ साहित्य संघाच्या जीवनव्रती पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून निवड.

२००२: जी. बी. पटनायक यांनी भारताचे ३२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

२०१६: तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा व्यवहारातून रद्द केल्या.

२०१६: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४५वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.

=========================================

ब) ८ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म.
   --------------------------

१६५६: खगोलशास्त्रज्ञ एडमंड हॅले यांचा जन्म. धूमकेतूची कक्षा मोजणारे पहिले शास्रज्ञ. (मृत्यू: १४ जानेवारी १७४२)

१८३१: भारताचे ३०वे गव्हर्नर-जनरल रॉबर्ट बुलवेर-लिटन यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर १८९१)

१८६६: ऑस्टिन मोटर कंपनीचे संस्थापक हर्बर्ट ऑस्टिन यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९४१)

१८९३: थायलँडचा राजा प्रजाधिपोक ऊर्फ राम (सातवा) यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९४१)

१९०९: स्वातंत्रसैनिक व पत्रकार नरुभाई लिमये यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९९८)

१९१७: कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ डॉ. कमल रणदिवे यांचा जन्म. (मृत्यू: ११ एप्रिल २०००)

१९१९: प्रसिद्ध लेखक, नाटककार, संगीतकार, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि अभिनेते पुरूषोत्तम लक्ष्मण उर्फ पु. ल. देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: १२ जून २००० – पुणे)

१९२०: भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना सितारादेवी यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर २०१४)

१९२७: भारताचे उपपंतप्रधान, केन्द्रीय माहिती व नभोवाणी मंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म.

१९५३: भारतीय राजकारणी नंद कुमार पटेल यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे २०१३)

१९७०: मायस्पेस चे सहसंस्थापक टॉम एंडरसन यांचा जन्म.

१९७४: नारुतो चे जनक मसाशी किशिमोतो यांचा जन्म.

१९७६: ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज ब्रेट ली यांचा जन्म.

=========================================

क) ८ नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यू.
    --------------------------

१२२६: फ्रान्सचा राजा लुई (आठवा) यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर ११८७)

१६७४: कवी, विद्वान व मुत्सद्दी जॉन मिल्टन यांचे निधन. (जन्म: ९ डिसेंबर १६०८)

१९६०: भारतीय हवाई दलप्रमुख सुब्रतो मुखर्जी यांचे निधन.

२०१३: भारतीय पत्रकार आणि अभिनेते अमांची वेक्कत सुब्रमण्यम यांचे निधन. (जन्म: २ जानेवारी १९५७)

२०१५: भारतीय एअर मर्शल ओमप्रकाश मेहरा यांचे निधन. (जन्म: १९ जानेवारी १९१९)

२०१५: उद्योगपती लॉर्ड स्वराज पॉल यांचे सुपुत्र तसेच कँपँरो ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंगद पॉल यांचे अपघाती निधन.

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.11.2021-सोमवार.