वास्तव चारोळ्या-"पिळवणूक होतेय ऊस-तोड कामगारांची,कहाणी आहे त्यांच्या कटू सत्याची

Started by Atul Kaviraje, November 10, 2021, 12:35:09 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                          विषय :ऊस-तोड  कामगारांची  कैफियत
                          वास्तव  गुलामगिरी -पिळवणूक  चारोळ्या
     "पिळवणूक होतेय ऊस-तोड कामगारांची,कहाणी आहे त्यांच्या कटू सत्याची"
   -------------------------------------------------------------------
     

(1)
आजही  होतेय  "पिळवणूक"  जमीनदारांकडून
जमीनदारकी  केव्हाच  झालीय  नामशेष
"ऊस -तोड  कामगार",अजुनी  राहिलाय  खितपत ,
भरडला  जातोय  चरकातल्या  उसाच्या  कांड्यागत .

(2)
बिदागी  नाही ,मजुरी  नाही,  रोजंदारी  नाही
अविरत  काम  करायचे  त्यांनी  शेतात  "उसाच्या"
अशातच  गेल्यात  त्यांच्या  पिढ्यान -पिढ्या  या  "पिळवणुकीत" ,
"ऊस"  पिकाला  ऐकवतोय  तो  आपले  हे  दुःख -गीत .

(3)
दिवसभर  खपायचे , राब -राब  राबायचे
"ऊस"  तोडता-तोडता ,हाताला  पडत  चाललेत  घट्टे
पण  डोळ्यांवर  आलीय  पैश्यांची  धुंदी  या  मालकशाहीच्या ,
त्यांच्या  पाठीवर  ओढताहेत  ते  अजुनी  रट्टे .

(4)
भूतकाळ  नव्हता ,वर्तमान  असाच  जाई , भविष्य  तर  नाहीच
इतका जुलूम  होऊनही  तो  उगा  उगाच  राही
कैफियत  मांडलीय  आजवर  कित्येकदा  त्याने  सरकारकडे ,
पण  सरकारचे  त्याच्याविना  कधीच  नाही  अडलेय  घोडे .

(5)
मधुर  साखरेचे  अमाप  पीक  देणारे  "ऊस -कामगार"
आज  कडवट  आवंढा  गिळून  गप्प  झोपताहेत
त्यांची  कैफियत  कुणा  कधी  कळेल  का  ?
त्यांच्या  हाताचे  घट्टे  कुणा  कधी  दिसतील  का  ?


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.11.2021-बुधवार.