कोरोना चारोळ्या-"महान कीर्तनकार महाराजांचे प्रबोधन, जनतेस करतंय चुकीचे संबोधन"

Started by Atul Kaviraje, November 11, 2021, 12:56:46 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

   विषय :श्रेष्ठ कीर्तनकार श्री  इंदुरीकर महाराजांचे लशीकरणाबद्दलचे चुकीचे विधान
                          वास्तव  कोरोना  लशीकरण  चारोळ्या
        "महान कीर्तनकार महाराजांचे प्रबोधन, जनतेस करतंय चुकीचे संबोधन"
-----------------------------------------------------------------------


(1)
श्रेष्ठ  "कीर्तनकार , प्रबोधनकार  इंदुरीकर  महाराजांस"  नमन  असो
समाजाचा  जागर ,जागृती  करणाऱ्या  या  महान  विभूतीस  प्रणाम  असो
कीर्तनात  केलाय   त्यांनी  आपल्या,  कोरोना  प्रसाराचा  अंतर्भाव ,
म्हणती  खंबीर  ठेवा  मन , कोरोनाचा  नाहीसा  होईल  प्रभाव .

(2)
१००  कोटींचे  झाले  लसीकरण , जनतेने  दोन्ही  डोस  घेतले
"इंदुरीकर  महाराज"  परि  आपल्या  वक्तव्यावर  कायमच  ठाम  राहिले
मी  लस  घेणार  नाही , माझ्या  कीर्तनाने  मी  प्रतिकारशक्ती  वाढवीन ,
लशी  न  घेता  मी  हा  कोरोना  बरा  करून  दाखवीन  !

(3)
कुठेतरी , काहीतरी  गणित  चुकतंय  "इंदुरीकर  महाराजांचे"
प्रश्न  नाहीय  कीर्तनाचा , प्रश्न  उद्भवलेय  कोरोना  प्रसाराचे
मनःशक्ती  सामर्थ्याने , योग्य -मुद्रेने  प्रतिकारशक्तीचे  वाढणे  ठीक  आहे ,
पण  त्याचबरोबर  जीवन  स्वास्थ्यासाठी  औषधोपचारांचीही  नितांत  गरज  आहे .

(4)
जनतेतील  हा  चुकीचा  प्रचार ,प्रसार  कृपया  त्यांनी  थांबवावा
वाढत्या  कोरोनाला , लशीकरण  हाच  एक  अंतिम  उपाय  असावा
लशीकरण  हेच  आहे  अस्त्र , कोरोनाचा  प्रसार  रोखण्यासाठी ,
MEDICAL  SCIENCE-ने  केलंय PROOV, लसीकरणाचा  अंगीकार  करावा .

(5)
शेवटी  आपणा  सर्वांना , मनुष्याला  भोग  आहेत , रोग  आहेतच
शरीर  आहे  तर  दुःख  आहे , यातना  आहेतच
कळकळीची  विनंती  "इंदुरीकर  महाराजांना" , कृपया  तुम्ही  लशीकरण  करावे ,
आणि  पुन्हा  एकदा  नव्या  जोमाने , कीर्तनास  उभे  रहावे  !


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.11.2021-गुरुवार.