वास्तव चारोळ्या- "अभ्यास सोडला घरदार सोडले, व्हिडीओ गेम-पायी आयुष्य बरबाद झाले!"

Started by Atul Kaviraje, November 13, 2021, 01:34:04 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

          विषय :गेमिंग ऍप-च्या नादी लागून अल्पवयीन मुलाने  घर  सोडले
                         वास्तव  मार्मिक  व्हिडीओ  खेळ  चारोळ्या
      "अभ्यास सोडला घरदार सोडले, व्हिडीओ गेम-पायी आयुष्य बरबाद झाले!"
    ------------------------------------------------------------------


(1)
तेव्हाची  पिढी --
   शिकायचे ,मोठे  व्हायचे ,आपल्या  पायांवर  उभे  राहायचे
   आई -वडिलांचे  नाव  राखायचे , त्यांना  सुखी  ठेवायचे
आजची  पिढी --
   शिक्षण  सोडायचे ,फक्त  "व्हिडीओ गेम"  खेळायचे ,स्वतःला  खोलीत  बंद  करायचे
   "गेमिंग  ऍप" -च्या  नादी  लागून , घरदार   सोडायचे , घरातून  पळून  जायचे ,
   आई -वडिलांना  घोर  लावायचा , त्यांना  दु:खी  करायचे  ?

(2)
या  "व्हिडीओ  गेम" -कर्त्यांनी  आजची  तरुणाई  बिघडवली  आहे
स्वतःच्या  खात्यात  भर  घालायची  एकही  संधी  सोडली  नाही
घरोघरी  मुलांना  "गेम" -चे  लावून  व्यसन , खोलीत  त्यांना  करून  बंदिस्त ,
त्यांच्या  भविष्याचा  करताहेत  ते  कळत -नकळत  अकालीच  अस्त .

(3)
"गेम" -च्या  नादी  लागायचे , ग्रुप -बरोबर  दिवसभर खेळतं  बसायचे 
काहीतरी  सनसनाटी , साहस  करण्या  घरदार  सोडायचे
शिक्षणाचे  वांदे , जेवणा -खाण्याचे  वांदे , या  "गेम" -साठी  सारे  व्यर्ज  करायचे ,
मग  कुणाचेही  न  ऐकता , हट्टाने  आपलेच  खरे  करायचे  .

(4)
आयुष्याचे  वाटोळे  करणाऱ्या  या " व्हिडीओ -गेम" वर  कायम  बंदी  आणावी
सरकारने  या  मुलांच्या  भविष्याची   सर्वतोरूपी  काळजी  वाहावी
या  मुलांची  काय  चूक  ? त्यांना  योग्य  मार्गदर्शन  मिळावे , समुपदेशन  मिळावे ,
"व्हिडीओ  गेम  ऍप"-ऐवजी , मोबाईलमध्ये  शैक्षणिक , माहितीपूर्ण  ऍप  भरावे .

(5)
आपल्या  मुलांकडे  आई -वडिलांनी  कायम  लक्ष्य  ठेवावे
इतर  शैक्षणिक , शिक्षणाभिमुखी  गोष्टींकडे  त्यांचे  लक्ष  वळवावे
घरच्या -घरी  वेळ  काढून  त्यांना  प्रेम ,आपलेपणा  द्यावा ,
या  "व्हिडीओ  गेम"-चा  मनी  उमटलेला  ठसा  कायमचाच  पुसून  टाकावा  !


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.11.2021-शनिवार.