"१४ नोव्हेंबर – दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, November 14, 2021, 11:17:12 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.११.२०२१-रविवार .जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                     "१४  नोव्हेंबर – दिनविशेष"
                                    -------------------------


अ) १४ नोव्हेंबर रोजी झालेल्या घटना.
   ------------------------------

१७७०: जेम्स ब्रूस यांनी नाईल नदीचा स्रोत शोधला.

१९२२: ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कंपनीने युनायटेड किंग्डम मध्ये रेडिओ सेवेची सुरूवात केली.

१९४०: दुसरे महायुद्ध – जर्मन वायूदलाने इंग्लंडमधील कॉव्हेंट्री शहरावर जोरदार बॉम्बहल्ला केला.

१९६९: जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची (JNU) स्थापना.

१९७१: मरीनर – ९ या अंतराळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला.

१९७५: स्पेनने पश्चिम सहारा सोडून दिले.

१९९१: जर्मनीचे चॅन्सेलर डॉ. हेल्मुट कोल यांची १९९० च्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

२०१३: सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीतला शेवटचा (२०० वा) कसोटी सामना खेळण्यास सुरुवात केली. वेस्ट ईंडीजविरुद्ध हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळण्यात आला.

=========================================

ब) १४ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म.
   ---------------------------

१६५०: इंग्लंडचा राजा विल्यम (तिसरा) यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च १७०२)

१७१९: ऑस्ट्रियन संगीतकार व व्हायोलिनवादक लिओपोल्ड मोत्झार्ट यांचा जन्म. (मृत्यू: २८ मे १७८७)

१७६५: वाफेवर चालणाऱ्या जहाजीचे निर्माते रॉबर्ट फुल्टन यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी १८१५ – न्यूयॉर्क, यू. एस. ए.)

१८६३: अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९४४ – बेकन, डचेस, न्यूयॉर्क, यू. एस. ए.)

१८८९: भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९६४)

१८९१: पुरावनस्पती शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (National Academy of Sciences) अध्यक्ष बिरबल सहानी यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १९४९ – पुणे)

१९०४: इंग्लिश क्रिकेटपटू हेरॉल्ड लारवूड यांचा जन्म. (मृत्यू: २२ जुलै १९९५)

१९१८: चित्रकार रघुवीर मूळगावकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९७६)

१९१९: स्वातंत्र्यसैनिक, लेखक अनंत काशिनाथ भालेराव यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑक्टोबर १९९१)

१९२२: संयुक्त राष्ट्रांचे ६ वे सरचिटणीस ब्यूट्रोस ब्यूट्रोस घाली यांचा जन्म.

१९२४: कथ्थक नर्तिका रोहिणी भाटे यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर २००८)

१९३५: जॉर्डनचे राजे हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: ७ फेब्रुवारी १९९९)

१९४७: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक भारतन यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९९८)

१९७१: ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक व धडाकेबाज फलंदाज अ‍ॅडॅम गिलख्रिस्ट यांचा जन्म.

१९७१: भारतीय शेफ आणि लेखक विकास खन्ना यांचा जन्म.

१९७४: क्रिकेटपटू हृषिकेश कानिटकर यांचा जन्म.

=========================================

क) १४ नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यू.
    ---------------------------

१९१५: अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ बुकर टी. वॉशिंग्टन यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १८५६)

१९६७: क्रिकेटपटू सी. के. नायडू यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १८९५)

१९७१: कादंबरीकार, चित्रपट कथालेखक नारायण हरी आपटे यांचे निधन. (जन्म: ११ जुलै १८८९ – समडोळी, जिल्हा सांगली)

१९७७: हरेकृष्ण पंथाचे संस्थापक अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १८९६)

१९९३: स्वातंत्र्यसैनिक डॉ. मणिभाई भीमभाई देसाई यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १९२०)

२०००: गीतकार व सर्जनशील कवी प्रा. योगेश्वर अभ्यंकर यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९२९)

२०१३: भारतीय निर्माते आणि व्यवस्थापक सुधीर भट यांचे निधन.

२०१३: भारतीय पत्रकार आणि लेखकहरि कृष्ण देवसरे यांचे निधन. (जन्म: ९ मार्च १९३८)

२०१५: भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक के.ए. गोपालकृष्णन यांचे निधन.

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.11.2021-रविवार.