आपल्यातले अंतर...

Started by Nachi, November 18, 2021, 03:42:10 PM

Previous topic - Next topic

Nachi

तुला आठवतात आपल्या गावांमधले ते तीन किलोमीटर...
कधीहि पार नाही करू शकलो आपण ते अंतर...

कधी आई वडिलांच्या प्रेमा पोटी,
तर कधी जातीपातीच्या खुळचट चालीरितीं साठी,
कधी समाज्याच्या भीती पोटी,
तर कधी वडील धाऱ्यांच्या आदरासाठी...

आणि खूप दूर निघून गेलो एकमेकांपासून कायमचे,  पुन्हा कधी  हि न भेटण्या साठी...

पण दैव हि आपल्या बरोबर खेळ खेळत असते,
आज इतक्या दिवसांनी एका नवीन शहरात पुन्हा आपल्यात तेच तीन किलोमीटर आहे...

आणि आज हि...

कधी जोडीदारांच्या विश्वासासाठी,
तर कधी लेकरांच्या माये पोटी,
कधी नात्यांच्या बंधनांसाठी,
तर कधी आपल्याच प्रेमाच्या पवित्रते साठी,

नाही पार करत ते अंतर आज हि...

इतरांच्या सुखा  साठी प्रत्येक वेळी आपल्याच प्रेमाची आहुती देत आलोय आपण,
कदाचित याच अग्नी परीक्षेत ते बनेल अधिकच सुंदर, शुद्ध आणि पवित्र...



--Nachi...