स्वप्नविराम...

Started by Nachi, November 18, 2021, 04:18:57 PM

Previous topic - Next topic

Nachi

प्रत्येक जण स्वप्न बघतात,
काही पूर्ण होतात काही अपूर्ण राहतात,

म्हणतात अपूर्णाला पुर्णत्वा ने भारत येते,
म्हणून प्रतेक जण असतो धडपडीत आपल्या स्वप्न पूर्तीच्या,

पण काही स्वप्न रेतीगत  असतात, एकदा हातातून निसटली तर  परत कधीच पूर्ण नाही करता येत,
मग फक्त स्वल्पविराम देऊन दडली जातात मनाच्या एका खोल कोपऱ्यात,
कायमची, पुन्हा कधीही बाहेर न येण्यासाठी,

पण स्वप्न दडवणे इतके सोपे नसते,
वेळोवेळी तो ती बाहेर डोकवतोच,

कुणाच्या अश्रूतून,
कुणाच्या लेखणीतून,
कुणाच्या कुंचल्यातून,
तर कुणाच्या कवितेतून....


--Nachi