आठवणीं चे पक्षी...

Started by Nachi, November 19, 2021, 01:12:37 PM

Previous topic - Next topic

Nachi


आठवणीं चे पक्षी, जेंव्हा बसतात मनाच्या फांदीवर,
नकळत जगून जाते पुन्हा ते तुझ्या सोबत चे सर्व क्षण...



जेंव्हा पहिल्यांदा पाहिले मी तुला नि तू मला,
क्षणभराची ती नजरभेट आयुष्याचे नाते जोडून गेली आपले...

जेंव्हा पहिल्यांदा तू म्हणाला माझे तुझ्यावर प्रेम आहे,
तेंव्हा स्वर्ग काय असतो या पृथ्वीवरच अनुभवून गेले होते मी...

जेंव्हा पहिल्यांदा तू घेतला होता  माझा हात तुझ्या हातात,
वाटले होते हि जन्मभराची न सूटणारी रेशीम गाठ आहे आता...

जेंव्हा पहिल्यांदा घेतले होते तू मला मिठीत तुझ्या,
त्या एका क्षणात साता जन्माचे प्रेम जगून गेले होते मी...

जेंव्हा पहिल्यांदा समजले आता आपल्याला कायमचे वेगळे व्हावे लागेल,
त्या एका क्षणाच्या मरण यातना आज हि भोगत आहे मी...


--Nachi...