हे काय कमी आहे...

Started by Nachi, November 19, 2021, 03:04:15 PM

Previous topic - Next topic

Nachi

नात्याला नाव नसले म्हणून काय झाले,
त्याचे अस्तित्व तर नाकारता येत नाही,
ह्रदयाचा ठोका  चुकतो  आजही तुझ्याच साठी,
हे काय कमी आहे...

हाता मध्ये हात नाही आपले आता,
पण हेच हात भगवंता  समोर जेंव्हा जुळतात,
तेंव्हा फक्त एकमेकां साठी सुखच मागतात,
हे काय कमी आहे...

डोळे  बघू शकत नाही एकमेकांना,
पण हेच डोळे तुझ्या आठवणीने भरून येतात,
आणि गर्दीत फक्त तुलाच शोधत राहतात,
हे काय कमी आहे...

ज्या वाटेवर रोज भेटायचो, सोबत चालायचो,
सुखं दुुःख वाटायचो, आयुष्याची स्वप्न रंगवायचो,
त्या वाटेवरून जाताना, आजही पाऊले थबकतात आणि क्षणभर तुझा भास होतो,
हे काय कमी आहे...

आपण नाही भेटू शकलो, पण मने कायमचीच जुळली गेली,
ज्या वळणावर एकमेकांना भेटण्याचे वचन दिले होते,
त्या वळणावर काळजाचा एक तुकडा आजही तझुी वाट पाहत उभा आहे,
हे काय कमी आहे....

नात्याला नाव नाही मिळाले कधी आपल्या,
पण एकमेकांच्या सुख दुःखा चा विचार करत, खरी मैत्री आजही निभावत आहे,
हे काय कमी आहे..


--Nachi...