शेतकरी चारोळ्या-"शेतकरी आंदोलनाला फळ आलंय, शेतकरी मागणी बिल संमत झालंय"

Started by Atul Kaviraje, November 21, 2021, 12:57:56 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

     विषय:शेतकऱ्यांविरुद्ध(अपक्ष)असलेले तीन ऋषी कायदे, सरकारने मागे घेतले .
                       वास्तव -शेतकरी  संमत  कायदे  चारोळ्या
       "शेतकरी आंदोलनाला फळ आलंय, शेतकरी मागणी बिल संमत झालंय"
   ---------------------------------------------------------------------


(1)
आज  "शेतकऱ्यांची"  आहे  खरी  दिवाळी  अन  दसरा
वर्षभराची  त्यांची  "आंदोलन"  तपस्या  पूर्णत्त्वास  आलीय
त्यांच्या  तपाला  योग्य  न्याय  अन  फळ  मिळालंय ,
उशिरा  का  होईना , त्यांचे  मागणी  बिल  सरकारने  संमत  केलंय .

(2)
तीन  जाचक , नकोसे , विरुद्ध  ऋषी  कायदे  मागे  घेत  सरकारने
"शेतकऱ्यांना"  न्याय ,दिलासा देऊन  योग्य  निर्णय  घेतलाय
ज्यासाठी  केला  होता  अट्टाहास , "शेतकऱ्यांनी"  सर्वस्व  पणाला  लावून ,
त्यांचा  हक्क ,अधिकार  त्यांना  पुनर -प्राप्त  झालंIय , निकाल  बाजूने  लागलाय .

(3)
आज  "शेतकऱ्यांची"  दसरा ,दिवाळी  साजरी  होत  आहे
मिठाई  वाटप  होत  आहे , फटाके  फुटत  आहेत
जल्लोषपूर्ण  वातावरणात  "शेतकरी"  सरकारचे  आभार  मानत  आहे ,
दीड -दोन  वर्षांचा  त्यांचा  वनवास  आज  संपुष्टात  आला  आहे .

(4)
खूपच  वळणे  घेत  होते  त्यांचे  हे  "आंदोलन"  भलतीकडेच
फाटेही  अनेक  फुटत  होते  नकोसे , नवीन  रस्ते  तयार  होत  होते
मूळ  मुद्दा  "शेतकऱ्यांचा"  राहिला  होता  बाजूस , विषय  भरकटत  होता ,
हवालदिल  "शेतकरी" , निर्णयाची ,न्यायाची  आतुरतेने  वाट  पाहIत  होता .

(5)
आज  कायदा , न्यायालय  "शेतकऱ्यांच्या"  बाजूने  उभे  आहे
त्यांना  हवेसे  स्वातंत्र्य , अथक  परिश्रमाने  त्यांना  प्राप्त  होत  आहे
लाखोंचा  पोशिंदा ,जनता -जनार्दनाचा  मित्र ,आज  खुश ,समाधानी  आहे ,
सरकारने  त्यांची  हमी  घेऊन , त्यांना  योग्य  तो  हमी -भाव  दिला  आहे .

(6)
"शेतकऱ्यांच्या"  कष्टाचे ,श्रमाचे ,मेहनतीचे  आज  चीज  झाले  आहे
त्यांचा  लढा ,त्यांचा  बाणा  त्यांना  त्यांचा  अधिकार  देऊन  गेला  आहे
एकीचे  बळ  काय  असते , त्यांनी  जगाला  दाखवून  दिले  आहे ,
एक  आदर्श ,धीरोदात्तपणाचे  उत्तम  उदाहरण  त्यांनी  घालून  दिले  आहे .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.11.2021-रविवार.