"२३ नोव्हेंबर – दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, November 23, 2021, 03:39:04 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२३.११.२०२१-मंगळवार. जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                     "२३ नोव्हेंबर – दिनविशेष"
                                    -------------------------


अ) २३ नोव्हेंबर रोजी झालेल्या घटना.
   ------------------------------

१९२४: एडविन हबल यांनी देवयानी (Andromeda) ही एक आकाशगंगा आहे असे प्रतिपादन केले.

१९३६: लाइफ मॅगझिन हे फोटो मॅगझिन म्हणून पुन्हा प्रकाशित झाले.

१९५५: कोकोज आयलंड्स या बेटांचा ताबा इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आला.

१९७१: चीनने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत प्रथमच भाग घेतला.

१९९२: आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला.

१९९९: नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार प्रदान.

=========================================

ब) २३ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म.
   ---------------------------

८७०: बायझँटाईन सम्राट अलेक्झांडर यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून ९१३)

१७५५: लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक थॉमस लॉर्ड यांचा जन्म. (मृत्यू: १३ जानेवारी १८३२)

१८८२: उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९५३)

१८९७: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बंगाली/इंग्लिश लेखक निराद सी. चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट १९९९ – लॅथबरी रोड, ऑक्सफोर्ड, इंग्लंड)

१९२३: लेखक नागनाथ संतराम तथा ना. सं. इनामदार यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर २००२)

१९२६: आध्यात्मिक गुरू सत्यनारायण राजू ऊर्फ सत्य साईबाबा यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल २०११)

१९३०: अभिनेत्री आणि गायिका गीता दत्त यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९७२)

१९६१: पापा जॉन पिझ्झा चे संस्थापक जॉन साटनर यांचा जन्म.

१९६२: भारतीय अमेरिकन वैज्ञानिक आणि आण्विक इमेजिंगचे प्रणेते संजीव सॅम गंभीर यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुलै २०२०)

१९६७: दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांचा जन्म.

१९८४: अभिनेत्री अमृता खानविलकर यांचा जन्म.

=========================================

क) २३ नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यू.
   ----------------------------

१९३७: नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १८५८)

१९५९: अभिनेते व निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: १२ मार्च १८९१)

१९७०: सिंगापूर देशाचे पहिले अध्यक्ष युसूफ बिन इशक यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९१०)

१९७९: भारतीय-अमेरिकन अभिनेत्री मरले ओबर्नॉन यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९११)

१९९३: इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक ब्रूनो रॉस्सी यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल १९०५ – व्हेनिस, ईटली)

१९९९: अर्थतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या कुमुद सदाशिव पोरे यांचे निधन.

२०००: चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्राचे कलासंचालक बाबूराव सडवेलकर यांचे निधन. (जन्म: २८ जून १९२८ – सावंतवाडी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र)

२००६: झेटा मासिकचे सहसंस्थापक जेस ब्लॅंकोनेलसला  यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९३६)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.11.2021-मंगळवार.