कमजोर

Started by शिवाजी सांगळे, November 23, 2021, 04:35:50 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

कमजोर

कशामुळे कमकुवत पडतो आम्ही
नकोशा गोष्टींमध्ये अडकतो आम्ही

घटना अनोख्या घडतात जीवनात
उगाच त्यांचा विचार करतो आम्ही

वेळोवेळी मिळतात कित्येक सुचना
विचार मना कितीदा मानतो आम्ही

सहज आहे तसा प्रवास जीवनाचा
प्रामाणिक त्याशी का राहतो आम्ही

नकोशा गोष्टींमध्ये अडकतो आम्ही
म्हणून 'शिवा' कमजोर होतो आम्ही

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९