म्हणी-"कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही"

Started by Atul Kaviraje, November 24, 2021, 06:16:46 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही"


                                              म्हणी
                                           क्रमांक-80
                        "कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही"
                       ---------------------------------------------


80. कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही
    -------------------------------------------

--निश्चित घडणारी घटना कोणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही.
--सत्य कधीही लपत नाही.
--जी गोष्ट व्हावयाचीच आहे त्याच्यावर कोणत्याही अडथळ्याचा परिणाम होत नाही.
--निश्चित घडणाऱ्या गोष्टी ह्या कधीच टाळता येत नाहीत.
--मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार-[तांबडे फुटणें=सूर्य उगवणें, उजाडणें.] योग्‍य वेळी ती ती गोष्‍ट व्हावयाचीच, त्‍याला प्रतिबंध करतांच येत नाही. सृष्‍टिक्रम हा अबाधित चालतो. तो कोणी बदलूं शकत नाही. कोंबड्याला ओरडूं दिला नाही म्‍हणून सूर्य थोडाच उगवावयाचा राहणार !
--स्पष्टीकरण :- नियमित आणि निश्चित घडणारी घटना, कुणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही.
--Definite events are not avoided in any way.


                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                   --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.11.2021-बुधवार.