चारोळ्या-"वकीलSTकर्मचाऱ्यांचे गुणरत्न सदावर्ते,मार्गदर्शक आहेत कर्ते आणि सIवरते"

Started by Atul Kaviraje, November 25, 2021, 12:33:30 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

   विषय : गुणरत्न  सदावर्ते  ST कर्मचाऱ्यांचे  काबील  वकील , त्यांच्या  बाजूने  उभे  राहून  त्यांची  केस  लढवीत  आहेत .
                 वास्तव -ST कर्मचारी  हक्क -लढा  आंदोलन  चारोळ्या
   "वकील ST कर्मचाऱ्यांचे गुणरत्न सदावर्ते,मार्गदर्शक आहेत ते कर्ते आणि सIवरते"
--------------------------------------------------------------------------


(1)
गुणवंत  वकील  लाभलेत  "ST कर्मचारी"  लढ्यास  पाठिंबा  देणारे
गुणगौरव  होई  त्यांचा  काबील  वकील  म्हणून , पाठीशी  उभे  राहणारे
आता  "ST कर्मचाऱ्यांचा"  विजय  अटळ  आहे , अंतिम  या  लढ्यात ,
"गुणरत्न  सदावर्ते" , "ST कर्मचाऱ्यांच्या"  आहेत  सोबतीस , उतरून  या  आंदोलनात .

(2)
त्यांचेवर  आहे  जबाबदारी , त्यांनी  दIविलाय  एकमेव  मार्ग  विलीनीकरणाचा
दुजा  नाही  मार्ग  कोणताही , ते  म्हणती  "ST कर्मचाऱ्यांच्या"  भविष्य -उद्धाराचा
त्यांचे  हक्क  त्यांना  मिळावेत , एक  दिशा  मिळावी , यास्तव  आहेत  ते  उभे ,
एकट्यानेच  लढवीत  आहेत  कोर्ट -किल्ला , मारा  करून  वाक -शब्द -तोफांचा .

(3)
ते  त्यांच्या  आहेत  पाठीशी , "ST कर्मचारी"  आहेत  त्यांच्या  पाठीशी
दोघांचा  आहे  एकमेकांना  आधार , अंतिम  सरशी  त्यांचीच  आहे
विजयश्री  नक्कीच  माळ  घालेल  गळ्यात , निःसंशय  थोड्याच  दिवसांत ,
याचा  "सदावर्तेना"  आहे  ठाम  विश्वास , नव्हे  तर  त्याची  खात्रीच  आहे .

(4)
"ST कर्मचाऱ्यांच्या"  मदतीस  त्यांचा  देव  धावून  आलाय
"गुणरत्न  सदावर्तेच्या" रूपात  त्यांना  प्रत्यक्ष  देवदूतच  दिसलाय
ते  फक्त  त्यांचे  वकीलच  नाहीत , त्यांची  केसच  नाहीत  लढत ,
"सदावर्तेत"  त्यांना  आपला  मोठा  भाऊ  दिसलाय , त्यांचा  पाठीराखाच  गवसलाय.

(5)
रात्रंदिन  "गुणरत्न"  त्यांची  काळजी  वहाताहेत , स्वप्न  त्यांनी  बाळगलंय
मिळवून  देईन  त्यांना  मी  न्याय , त्यांचे  आजपावेतो  हितच  पाहिलंय
"ST कर्मचाऱ्यांच्या"  विशाल  कुटुंबाचा  ते  एक  छोटासा  हिस्सा  झालेत ,
या  कुटुंबाचा  एक  आधार , कुटुंब -प्रमुख , म्हणून  ते  ओळखले  जाऊ  लागलेत .

(6)
आता   नकोत  अधिक  आत्महत्त्या ,दुःख ,त्रास ,यातना ,वेदना ,उपोषणे
"गुणरत्न  सदावर्तेनी" मांडलंय  कोर्टात  सरकारपुढे  "ST कर्मचाऱ्यांचे"  गाऱ्हाणे
ठाम  आहेत  ते  आपल्या  निर्णयावर , त्यांचे  उचलून  धरलंय  त्यांनी  मागणे ,
विलीनीकरण  एकचं  आहे  उत्तर , "ST कर्मचाऱ्यांचे"  भविष्यात  होईल  सुकर जगणे.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.11.2021-गुरुवार.