राजकारणी चारोळ्या- "दिवस सरकारचे मोजायचे बंद करा,जनतेच्या हाती आहे हा खेळ सारा"

Started by Atul Kaviraje, November 26, 2021, 12:59:18 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

विषय : मुंबई  येथे  नेत्यांची  भाषणातून  एकमेकांवर  कुरघोडी , एक  नेता  म्हणतोय , २८  वेळा  सरकार  पडेल , तर  दुसरा  नेता  म्हणतोय , सरकार  अजून  २५  वर्षे  टिकेल .
                         वास्तव -मार्मिक  राजकारणी  चारोळ्या
        "दिवस सरकारचे मोजायचे बंद करा,जनतेच्या हाती आहे हा खेळ सारा"
--------------------------------------------------------------------------


(1)
"राजकारणात"  नेत्यांची  एकमेकांवरली  शाब्दिक  चकमक  माहित  होती
वाक -युद्ध ,जीभ  घसरणे  याचीही  नकळत  प्रचिती  येत  होती
पण  आता  चक्क  ते  भाकीतही  करू  लागलेत ,"सरकारचे"  दिवस  मोजू  लागलेत ,
"राजकारणातल्या"  त्यांच्या  यI  नव्या  खेळीत  ते  नवं -नवे  रंग  भरू  लागलेत .

(2)
अटकळ ,अंदाज  करून  काहीही  फायदा  नाहीय  नेत्यांनो
मताची  पेटी  आजही , अजूनही  आहे  "जनतेच्याच"  हातात
म्हणून  तुम्ही  कोण  येईल ,कोण  आपटेल , याची  चिंता  सोडावी ,
तुमच्या  आताच्याच  खुर्चीची   तुम्ही ,  सर्वतोपरी  काळजी  घ्यावी .

(3)
"सरकार"  पडेल ,"सरकार"  घडेल ,हे  आता  "निवडणुकीतूनच"  कळेल
त्यासाठी  आताच  भविष्य ,भाकीत  करणे  सोडून  द्या
अजूनही  कितीतरी  मुद्दे  आहेत  प्रलंबित , त्यावर  कार्य  व्हावे ,
खुर्ची  वाचविण्यासाठी , एकमेकांवरील  आरोप -प्रत्यारोप  टाळावे .

(4)
"जनतेचे'  आहे  लक्ष  तुमच्याकडे , ती  नाहीय  काही  आंधळी
तीच  ठरविलं  कोणाचे  राज्य  येईल ,आणि  कोण  जाईल  बळी
म्हणून  वाद  सोडा , प्रयत्न  करा , उतरवा  म्हणणे  "जनतेच्या"  गळी ,
तोवर  उगी  राहा , गप्प  राहा , शांत  बसा , अळी  मिळी  गुप  चिळी  !

(5)
"जनता  जनार्दन"  म्हणते  तोच  अंतिम  निर्णय  होतो , ठरावच  होतो
"निवडणुकांतूनच"  नवीन  'सरकारचा" , अंतिम  निकाल  लागतो
कोण  येईल  खुर्चीवर , कोण  राहील,  कोण  टिकेल  सत्तेवर ,
हे  आताच  बोलून  उपयोग  नाही , ते  भविष्य -काळच  ठरवितो .

(6)
यास्तव  हे  परस्परांवरले  वाक -बाण  युद्ध  थांबवा
काळच  ठरविलं , कोण  नाही  अन  कोण  सत्तेवर  यावा
तोवर  HOLD  YOUR HORSES, या  निरर्थक  अटकळी  बंद  करा ,
उद्याचे  कोणी  जाणिले , आजच्याच  कार्यात  मन  गुंतवा , मनापासून  काम  करा .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.11.2021-शुक्रवार.