लशीकरण चारोळ्या-"ताई उभी हाती डफले घेउनी,जनजागर करिते लशीकरणा दवंडी पिटुनी"

Started by Atul Kaviraje, November 27, 2021, 01:00:30 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

विषय : बुलढाणा  येथे  ताई  जाधवांनी , हाती  डफले  घेऊन , दवंडीतून  लशीकरण  जन -जागृती  केले .
          वास्तव -कोरोना  लशीकरण  अनोखी  जन -जागर  योजना  चारोळ्या
        "ताई उभी हाती डफले घेउनी,जनजागर करिते लशीकरणा दवंडी पिटुनी"
--------------------------------------------------------------------------


(1)
हाती  "डफले"  , शाहिरी  अंदाज , कमरेसी  खोचुनी  शेले
"दवंडी"  पिटून  "ताई"  उभी , करण्या  जनतेचे , लोकांचे  चांग -भले
या  जनहो , "लशीकरण"  करा , कोरोना  विळख्यातून  मुक्त  व्हा  !
ही  "ताई"  उभी,  करिते  स्वागत , तुम्ही  जागरात  सहभागी  व्हा  !

(2)
मोकाट  कोरोना , मुकाट  जनता , उभी  बिचारी , विचारी
उपाय  सांगा  "ताई"  आम्हा  हो , कोरोनाची  नजर  आहे  विखारी
"दवंडी"  पिटून  "ताई"  म्हणते , धीर  धरा , या  लशींचे  स्वागत  करा ,
त्वरा  करा  हो  त्वरा  करा ,आजच्या -आज  तुम्ही  "लशीकरण"  करा .

(3)
"जाधव  ताईंचे"  अनोखे ,अभूतपूर्व  हे  जन -जागृतीचे  यत्न
समाजास आहे प्रतीक्षा  अश्या  अनेक  देव -दूतांची , "ताई"  आहेत  एक  रत्न
"डफले"  घेऊन  हाती , पिटून  "दवंडी" , करिते  जन -जागरा  प्रयत्न ,
गैरसमज  जनतेचा  करण्या  दूर , कार्यरत  आहेत  "ताई"  रात्रं -दिन .

(4)
समूळ  टाकूया  उखडून , बिमोड  करूया , या  कोरोना  राक्षसाचा
तालावर  "ताई"  गाताहेत  कवने  शाहिरी  खड्या  आवाजात
एकत्र  या ,एकजूट  करा , लस  घ्या , "लशीकरण"  करा ,
एकचं  मंत्र , हा  आहे  अंतिम  उपाय ,सांगती  त्या  आपुल्या  कवनात .

(5)
"ताई  जाधव"  आहेत  आदर्श  आमुच्या , आम्हा  दाविती  मार्ग
"डफलीतून"  एकचं  संदेश  घुमतो ,"लसीकरणाचा"  सुपंथी , सुमार्ग
जनकल्याणI  "ताई"  झटती , जनतेचे  हित  डोळ्यांपुढे  ठेवुनी ,
हा  अनोखा  "डफली -दवंडी"  मार्ग , स्वीकारलाय  त्यांनी , जनतेस  साहाय्य  करुनी .

(6)
अश्या  अनेक  समाजसेवी  मंडळांनी , कार्यकर्त्यांनी  पुढे  यावे
जनतेस  आहे  आज  तुमच्या  खऱ्या  मार्गदर्शनाची  गरज
एक  नवे  सुदृढ ,निरोगी ,निरामय  आयुष्य  सर्वांनी  जगावे ,
"ताई  जाधवांना"  माझे  शतशः  प्रणाम , त्यांचे  आहेत  समाजावर  उपकारच .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.11.2021-शनिवार.