तेंव्हा तुझी आठवण येते...

Started by Nachi, November 27, 2021, 08:44:48 AM

Previous topic - Next topic

Nachi


आयुष्यात मागे वळून बघते, तेंव्हा अनुभवते,
असे क्वचितच क्षण असतील जेंव्हा तुझी आठवण नसेल,
पण काही क्षण असे आहेत की जेंव्हा काय सांगू सख्या तुझी खूप आठवण येते....

जेंव्हा मोगरा फुलतो आणि कोकीळ मधुर गीत गाते, त्यांच्या  या चाहुलीने माळरान बहरून येते,
तेंव्हा काय सांगू सख्या तुझी खूप आठवण येते...

जेंव्हा पावसाचा पहिला थेंब पडतो तप्त धरणी वर, आणि त्या मधुर सुगंधाने मोहरते वेडे मन माझे,
तेंव्हा काय सांगू सख्या तुझी खूप आठवण येते....

जेंव्हा नभ भरून येतात, आणि ओल्या पायवाटा उदास होतात, त्या वाटांवरून जाताना मनही भरून येते,
तेंव्हा काय सांगू सख्या तुझी खूप आठवण येते...

ज्या वाटांवरून सोबत चालायचो, आयुष्याची स्वप्न रंगवायचो, त्या वाटांवरून एकाकी चालताना पाऊले थबकतात  आणि  क्षणभर तुझा भास होतो,
तेंव्हा काय सांगू सख्या तुझी खूप आठवण येते....

जेंव्हा एखादया वेडीची आपल्या सजनाची वाट बघताना ची व्याकूळ नजर बघते, क्षणभर तिच्यात स्वतःलाच बघते,
तेंव्हा काय सांगू सख्या तुझी खूप आठवण येते...

आयुष्याच्या सुखं दुःखात मन कधी होरपळते, मनसोक्त रडण्यासाठी हक्काचा कांधा शोधते,
तेंव्हा काय सांगू सख्या तुझी खूप आठवण येते...

कधी स्वतःलाच आरश्यात बघते, आयुष्याच्या जबाबदाऱ्या पार पाडणारा मुखवटा बाजूला करून पहीलेची तुझी वेडी मी मला दिसते,
तेंव्हा काय सांगू सख्या तुझी खूप आठवण येते...


--Nachi...