विलीनीकरण चारोळ्या-"विलीनीकरणहवंय आम्हा विलीनीकरण,तोवर राहीलआमचे आंदोलनाचेच धोरण

Started by Atul Kaviraje, November 28, 2021, 01:00:32 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

 विषय : ST कर्मचाऱ्यांची  नवी  मागणी , विलीनीकरण  नाही, तर एकही बस रस्त्यावरून धावणार  नाही.
             वास्तव -ST कर्मचारी  विलीनीकरण  नवे  आंदोलन  चारोळ्या
                             ST कर्मचाऱ्यांची  कैफियत
  "विलीनीकरण हवंय आम्हा विलीनीकरण,तोवर राहील आमचे आंदोलनाचेच धोरण"
--------------------------------------------------------------------------


(1)
"विलीनीकरण"  हवंय  आम्हा  "विलीनीकरण",तोवर राहील आमचे आंदोलनाचेच  धोरण
याचसाठी  सारा  केला  होता अट्टाहास , यापाठी  नव्हते  दुसरे  कोणतेही  कार्य -कारण
हक्क ,अधिकार  आमचे  आम्हा  द्या ,आम्हाला  मानाने  जगू  द्या ,
आमचा  भविष्य -काळ  सुकर  करा ,आम्हाला  समाधानाचा  श्वास  घेऊ  द्या  !

(2)
जोवर  "विलीनीकरण"  नाही , तोवर  आंदोलन  थांबणार  नाही
फक्त  वेतन -वाढच  नकोय ,तेवढ्यावरच  आमचे  समाधान  नाही
इतरही  हक्क ,फायदे  आम्हा  मिळावेत , नव्हे  तो  आमचा  अधिकारच  आहे ,
यापूर्वीच  व्हावया  हवे  होते  आंदोलन , तसा  आता  उशीरच  झाला  आहे .

(3)
जोवर  "विलीनीकरण"  नाही , तोवर  लालपरी  रस्त्यावरून  धावणार  नाही
महिताहे  प्रवाशालाही  होतोय  त्रास , पण  तोही  आमच्याच  बाजूने  उभा  राही
ST महामंडळाचा  तोटा  अधिक  सहन  करू  नका , त्वरित  पाऊले  उचला ,
मागण्या  मान्य  करा ,ST महामंडळाचे  राज्य  सरकारमध्ये  "विलीनीकरण"  करा .

(4)
तिजोरी  होईल  थोडीशीच  रिकामी , पण  आश्वासन  देतोय  तुम्हाला
रात्रं -दिवस  काम  करून  आम्ही  भरून  काढू , या  तुटीला ,नुकसानीला
प्रामाणिकपणावर  आमच्या  अविश्वास  दाखवू  नका ,खात्री  ठेवा ,
जनताच  आहे  आमची  माय -बाप , तिची  करू  द्या  आम्हा  मनापासून  सेवा  !

(5)
माझा  महाराष्ट्र ,आपला  महाराष्ट्र , मराठी  माणसाचा  विचार  करा
एक -जुटीचा ,एकीचा ,संघटनेचा ,स्व -बळाचा  देतोय  आम्ही  नारा
या  मराठी  माणसाकडे  लक्ष  द्या ,त्याचे  गाऱ्हाणे  ऐकून  घ्या  !
आम्हालाही  आहे  आमचे  भविष्य , आम्हाला  तो  सुदिन  पाहू  द्या  !

(6)
जास्त  नाही काही  मागणे , आंदोलन  नाहीय  आमच्या  रक्तात
पण  हक्क  प्राप्त  होण्यासाठीच , घेतलीय  आम्ही  उडी  या  यल्गारात
"विलीनीकरण"  व्हावे  लवकरात  लवकर , या  येत्या  आगामी  काळात ,
लाल -परीही  पाहतेय  वाट  उत्सुकतेने , कधी  धावेन  मी  रस्त्यात  !


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.11.2021-रविवार.