म्हणी-"खोट्याच्या कपाळी गोटा"

Started by Atul Kaviraje, December 06, 2021, 06:01:09 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे -"खोट्याच्या कपाळी गोटा"

                                           म्हणी
                                        क्रमांक-88
                                 "खोट्याच्या कपाळी गोटा"
                                ------------------------


88. खोट्याच्या कपाळी गोटा
    ----------------------

--वाईट कृत्य करणार्‍या माणसाचे शेवटी वाईटच होते.
--खोटेपणा वाइट गोष्टींकडे परावर्तित करतो.
--खोटे बोलणाऱ्याला कधी न कधी तरी शिक्षा होतेच.
--खोटेपणा करणाऱ्याला शिक्षा भोगावी लागते.
--जो मनुष्य वाईट काम करतो त्याचा परिणाम त्याला भोगावाच लागतो.
--खोटेपणा वाईट काम करणाऱ्यांचे नुकसान होते.
--खोटेपणाने वाईट काम करणाऱ्यांचे नेहमी नुकसानच होते.
--खोट्‌याचे कपाळी कुर्‍हाडीचा घाव प्रमाणेच. ''आपला मतलब साधेल असे त्‍यास वाटत होते पण 'खोट्‌याच्या कपाळी गोटा' या म्‍हणीप्रमाणें सर्व बेत फसला.'-विक्षिप्त ३.१८०.
--वाक्य वापर : राजकारणात शेवटी खोट्याच्या कपाळी गोटा येणे निश्चित असते.


                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                  ------------------------------------------

          खोट्याच्या कपाळी गोटा ! False forehead!-लेख(भाग-१)---
         ----------------------------------------------------

     माणसाला आपलं खरं जीवन जगायचं असेल तर त्यांन नक्की खेडेगावातल्या एखाद्या छोट्या वाड्या वस्तीत जन्माला याव.त्याचं ते जन्माला येण,त्याचे वावरणं,त्याचं बालपण,त्याचं मोठेपण,त्याचं वृद्धत्व आणि त्याच मातीत त्याचे निर्माण होणार तो देह या सार्‍या गोष्टी अतिशय मनोरंजन कारक मनाला शांती देणाऱ्या आणि आत्म समाधानी असतात. जरी वास्तव असलं तरी,या वास्तवाचा शहरी बाबू खोट्याच्या कपाळी गोटा लावून घ्यायला तयार होत नाहीत. जगाच्या बदलत्या काळानुसार,शहरे आणि ग्रामीण खेडेगाव, या दोन्हींचा झपाट्याने झालेला विस्तार पाहता, शहरे ही अतिशय सुरेख अशी नंदनवनात असल्यासारखी दिसू लागलेले आहेत.या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधलेल्या मजले दर मजले,इमारती,शहर वस्तीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला भुरळ घालत असतात.ही,भुरळ एवढे मोठे असते की, इतर येणाऱ्या प्रत्येकाला,आपण का राहू नये याचा आभास निर्माण होण्यास सुरुवात होते. इथल्या जगण्याच्या वेगळ्या शैलीमध्ये, इथल्या बोलण्याच्या बोलीभाषेला, त्याला स्वीकार असं वाटत, हा देखील त्याच्यातला एक मोठा बदल झालेला असतो.

     रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या मोठ्या देखण्या चारचाकी गाड्या, मोठ्या आजूबाजूला असणारी हॉटेल आणि त्यातून आतुन येणारा खाद्यान्न पदार्थाचा दरवळणारा सुवास, क्षणभरासाठी आलेल्यांची पावले नक्कीच त्याठिकाणी घुटमळू लागतात. अशा श्रीमंत शहरांमध्ये बांधलेले मोठमोठाले बंगले, आणि या बंगल्याच्या आतील,अतिशय देखणं असं सजवलेलं ते रूप पाहता क्षणी एखाद्याचं मन भरून जाणार ठरतं मात्र अशा या बंगल्याच्या आतील काळवंडलेली मणे, स्वार्थानं बरबटलेली त्यांची ती वृत्ती,नकली जगण्याची त्यांची ती पद्धत, स्वहित जोपासण्याची वा सांभाळण्यासाठी त्यांची अखेरच्या श्वासापर्यंत चाललेली धडपड,खोट्याच्या कपाळी गोटा मारुन घ्यायला तयार होत नाही. कारण इथल्या शहरांमध्ये जे काही, पिकत तेच विकलं जातं.इथले रस्ते बंद करणे हे इथल्याच व्यवस्थेच्या,स्टंटबाजी आंदोलनाचा एक प्रकार आहे.अनेक जणांची मॅनेज होणारी आंदोलने,केवळ आणि केवळ रस्ता सुरक्षा विभागाच्या मानगुटीवर बसतात. रस्त्यावरच्या गर्दीतून पुंगळी काढून भरधाव वेगाने जाणारी ती तरणीबांड पोर,ट्राफिक पोलिसाला दिवसाकाठी शे पाचशे हजार रुपये मिळवून देतात. महापालिका,कलेक्टर कचरी, जिल्हापरिषदांच्या,दारासमोरच्या रस्त्यावर अनेक जणांचे हात फक्त लिखनावळींची फी घेण्यासाठी तरतरलेली असतात. तर सरकारी कार्यालयात कार्यालयाच्या आतल्या टेबलावरचे हात,टेबलावरती नमस्कार बसा अशी पाटी लावून टेबलाखालून घेण्यासाठी राजीखुशीने तयार असतात. अनेक रिक्षावाल्यांच्या नजरा सावज टिपण्यासाठी भिरभिरत असतात.

लेखक-श्री.तानाजी सखाराम कांबळे.
-------------------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मी मराठी.कॉम)
                   -----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.12.2021-सोमवार.