प्रेम तर अजूनही तेच आहे सख्या...

Started by Nachi_k, December 08, 2021, 09:55:05 AM

Previous topic - Next topic

Nachi_k

प्रेम तर अजूनही आहे सख्या,
फक्त वाटा वेगळ्या आहेत...

मी अजून तीच मी आहे, तू हि अजून तोच तू आहे,
प्रेम अजूनही तेच प्रेम आहे, भावनाही अजून त्याच आहेत,
फक्त अंतर वेगळे आहे...

एकमेकांना सुखी पाहण्याची ईच्छा तीच आहे, प्रार्थना हि तीच आहे,
एकमेकांची काळजी हि तीच आहे, स्वप्नं हि अजून तीच आहेत,
फक्त नाते वेगळे आहे...

त्या वाटा हि तिथेच आहेत, त्या जागा हि तिथेच आहेत,
तिथे रंगवलेली स्वप्न हि तीच आहेत, एकमेकांना दिलेली वाचणे हि अजून तीच आहेत,
फक्त आपले हात वेग वेगळे आहेत...

आयुष्य हि तेच आहे, जगणे हि तेच आहे,
बंधने हि तीच आहेत, जबाबदाऱ्या हि अजून त्याच आहेत,
फक्त जीवन जगण्याची ईच्छा वेगळी आहे...

सुख हि तीच आहते, दुःख हि तीच आहते,
अगतिकता हि तीच आहे, असाह्यता हि अजून तीच आहे,
फक्त वेळ वेगळी आहे...

समुद्र हि तोच आहे, सूर्यास्थ हि तोच आहे,
किनारा हि तोच आहे, वारा हि अजून तोच आहे,
फक्त लाटा वेगळ्या आहेत...


-Nachi