"०८-डिसेंबर – दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, December 08, 2021, 04:59:14 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०८.१२.२०२१-बुधवार. जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                    "०८-डिसेंबर – दिनविशेष"
                                    ------------------------


अ) ०८ डिसेंबर रोजी झालेल्या घटना.
   ------------------------------

१७४०: दीड वर्षाच्या लढाईनंतर रेवदंड्याचा किल्ला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकला.

१९३७: भारतीय पहिली दुमजली बस मुंबईत धावू लागली.

१९४१: दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानी फौजांनी एकाच वेळी मलेशिया, थायलंड, हाँगकाँग, फिलीपाईन्स व डच इस्ट इंडिजवर हल्ला केला.

१९५५: युरोप परिषदेने युरोपचा ध्वज अवलंबला.

१९७१: भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय आरमाराने पाकिस्तानमधील कराची बंदरावर हल्ला केला.

१९८५: सार्क परिषदेची स्थापना.

२००४: रवींद्रनाथ टागोर  यांच्या चोरीस गेलेल्या नोबेल पदकाची प्रकृतीची स्वीडन सरकारने भेट दिली.

२००४: ख्रिश्चन ज्युनियर या फुटबॉलपटूच्या मृत्यूस कारण ठरलेल्या मोहन बागानचा गोळी सुब्रतो पॉलवर बंदी.

२०१६: इंडोनेशियातील असेह प्रांतात ६.५ रिश्टर चा भूकंप. यात किमान ९७ लोक मृत्युमुखी.

=========================================

ब) ०८ डिसेंबर रोजी झालेले जन्म.
   ---------------------------

१७२०: बालाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवा यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १७६१)

१७६५: प्रख्यात शास्रज्ञ एलि व्हिटने यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १८२५)

१८६१: जनरल मोटर्स आणि शेवरलेट चे संस्थापक विलियम सी. दुरंत यांचा जन्म. (मृत्यू: १८ मार्च १९४७)

१८७७: नारायण सदाशिव मराठे तथा केवलानंद सरस्वती – महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च १९५५)

१८९४: पॉपय कार्टून चे निर्माते ई. सी. सेगर यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १९३८)

१८९७: हिंदी कवी पं. बाळकृष्ण शर्मा उर्फ नवीन यांचा जन्म. (मृत्यू: २९ एप्रिल १९६०)

१९००: जागतिक कीर्तीचे नर्तक व नृत्यदिगदर्शक उदय शंकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९७७)

१९३५: चित्रपट अभिनेते धर्मेंद्र यांचा जन्म.

१९४२: भारतीय क्रिकेटपटू हेमंत कानिटकर यांचा जन्म.

१९४४: चित्रपट अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा जन्म.

१९५१: नोर्थेन अंड शेल चे संस्थापक रिचर्ड डेसमंड यांचा जन्म.

=========================================

क) ०८ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू.
   ---------------------------

१९७८: इस्रायलच्या ४थ्या तसेच पहिल्या महिला पंतप्रधान गोल्डा मायर यांचे निधन. (जन्म: ३ मे १८९८)

२०१३: नोबेल पारितोषिके ऑस्ट्रेलियन-इंग्लिश केमिस्ट आणि शैक्षणिक जॉन कॉर्नफॉथ यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९१७

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.12.2021-बुधवार.