म्हणी-"गर्वाचे घर खाली"

Started by Atul Kaviraje, December 08, 2021, 06:16:52 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे -"गर्वाचे घर खाली"

                                          म्हणी
                                       क्रमांक-90
                                    "गर्वाचे घर खाली"
                                   -----------------

90. गर्वाचे घर खाली
    ----------------

--गर्विष्ठ माणसाची कधीतरी फजिती होतेच.
--गर्विष्ठ माणसाला शेवटी अपमानीत होण्याची वेळ येते.
--गर्विष्ठ माणसाचा नेहमी शेवटी अपमानच होतो.
--संस्कृतपर्यायः - अतिदर्पे हता लङ्का।
--गर्विष्ठ माणसाला एक ना एक दिवस अपमान सहन करावा लागतो. त्याचे गर्वहरण होतेच.
--गर्व असलेल्या माणसाचा पराजय होतोच.
--गर्विष्ठ माणसाची शेवटी फजितीच होतेच.
--गर्वाचा किंवा अभिमानाचा अतिरेक केल्यास त्याचा परिणाम वाईटच होतो.
--गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावा लागतो.
--मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार-गर्विष्‍ठ माणसाची मानहानि व विपन्नावस्‍था होण्याचे राहात नाही. गर्वाचा परिणाम वाईट. जो मनुष्‍य फार गर्व करतो त्‍याचा नक्षा उतरतो
जो मनुष्‍य फार ऐट करतो त्‍यास बहुधा खाली पाहण्याची पाळी येते. 'तों गर्वाचे घर खाली.' ईश्र्वरास साहेना.'-भाब ८२. 'गर्वाचे घर खाली या तत्त्वाचे ऐतिहासिक उदाहरण द्यावयाचे आहे, तर ते १८१५, १८७०, १९१ व १९४० या साली झालेल्‍या फ्रेंच व जर्मन राष्‍ट्रांच्या वर्तनावरून मात्र उलट सुलट रीतीनें, देतां येईल.'-केसरी २५-६-४०.
--वाक्य वापर : गर्वाचे घर कधी ना कधी खाली होतच असते, हे लक्षात घेऊन सत्ता आणि संपत्तीचा उन्माद करावा.

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                 ----------------------------------------------


                  कथालेखन- गर्वाचे घर खाली--कथा क्रमांक-१--
                -----------------------------------------

     एका नगरात दोन श्रीमंत व्यापारी राहत होते. ते एकमेकांना खाली पाडण्याची एकही संधी सोडत नसत. एकाचं नाव होतं, लक्ष्मीकांत आणि दुसऱ्याच नाव होत वत्सराज. दोघांपैकी लक्ष्मीकांत थोडा जास्त गर्विष्ठ होता. एक दिवस मागचे सर्व विसरून वत्सराज लक्ष्मीकांताला भेटावयास गेला. तो महालाच्या दरवाज्याजवळ आलेला पाहून लक्ष्मीकांताने आपल्या नोकरास बोलावून सांगितल, 'मी बाहेर गेलो आहे असं वत्सराजला सांग.' नोकर म्हणाला, 'पण शेठजी आपण तर घरी आहात मग असं सांगून कसं चालेल?'. त्यावर शेठजींना राग आला आणि म्हणाले, 'जेवढं सांगितलं आहे तेवढंच कर. स्वतःच डोकं वापरू नकोस'. नोकर चुपचाप दरवाज्याजवळ आला आणि वत्सराजला म्हणाला,' आमचे शेठजी बाहेर गेलेत. आपण नंतर आलात तर बरं होईल.' खरंतर वत्सराजने महालाच्या खिडकीतून लक्ष्मीकांत घरी असल्याच पाहिलं होतं. मात्र नोकराच्या उत्तराने तो अचंबित झाला आणि निघून गेला. त्यानेही मग लक्ष्मीकांतला घरी आल्यावर असंच सांगण्याच ठरवलं. या घटनेला काही दिवस उलटतात. ही घटना लक्ष्मीकांत विसरूनही जातो. लक्ष्मीकांताच्या एकुलत्या एका मुलीच लग्न ठरतं. संपूर्ण नगरात बोलावणी गेली. पण काही खास लोकांकडे लक्ष्मीकांत स्वतः गेला. तसंच त्याने वत्सराजाकडे स्वतः जाण्याच ठरवलं. वत्सराजाने मुख्य दरवाज्याजवळ लक्ष्मीकांत आला असल्याचं पाहिला होतं आणि तो कशासाठी आला असल्याचंही त्याला माहित होतं. 'शेठ घरात आहेत का?' अशी हाक ऐकून नोकर दरवाजा उघडण्यासाठी पुढे गेला. त्याला अडवीत वत्सराज म्हणाला, 'थांब, तू जाऊ नकोस. मीच जातो दरवाजा उघडायला.' हसरा चेहऱ्याने, हातात निमंत्रण पत्रिका घेऊन नमस्कार करीत उभ्या असलेल्या लक्ष्मीकांतला तो म्हणाला, 'आमचे शेठ घरात नाहीत. आपण नंतर आलात तर बरं होईल.' हे ऐकून लक्ष्मीकांत म्हणाला,' अरेच्या, तुम्ही स्वत:चं घरात नसल्याच काय सांगता?'. त्याला प्रतिउत्तर देत वत्सराज म्हणाला, 'काय हरकत आहे? मी तर त्या दिवशी तुझ्या नोकराच्या सांगण्यावर विश्वास ठेवून, तू घरात असतानाही निघून गेलो. आत्ता तर मी स्वत: सांगतोय तरी तुम्हाला विश्वास बसत नाही?' आपली चुक कळून लक्ष्मीकांत वरमतो आणि चुपचाप निघून जातो.

--अरुण कोरडे
--------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
                   ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.12.2021-बुधवार.