आत्महत्याप्रयत्नचारोळ्या-"आताअजून कितीवाट पाहायची?हीरात्रआहे मरणालाचकवटाळण्याची"

Started by Atul Kaviraje, December 09, 2021, 01:25:04 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

 विषय : लातूर  येथे  एक  ST कर्मचारी श्री.रवी बिरादार यांचा आत्म-दहनाचा  प्रयत्न .
                   वास्तव -ST कर्मचारी  आत्म-हत्या  प्रयत्न -चारोळ्या
                      ST कर्मचारी  श्री .रवी  बिरादार  यांचे  मनोगत
    "आता अजून किती वाट पाहायची? ही रात्र आहे मरणालाच कवटाळण्याची"
--------------------------------------------------------------------------


(1)
महिना  उलटला  संपाला , कसा  गेला  फक्त  मलाच  आहे  ठाऊक
या  आंदोलनाचा  अंत  काय , याचा  शेवट  काय , हेही  नाही  ठाऊक
पण  आता  धीरच  खचलाय , आत्म -विश्वासाला  पडत  चाललाय  तडा ,
बुद्धीच  चालत  नाहीय , खंत  हीच , कसा  ओढावा  संसाराचा  गाडा  ?

(2)
आता  एकचं  मार्ग  दिसतोय , नजरेसमोर  माझ्या  अगदी  स्पष्ट
धैर्य  सार  गळून  पडलंय , कापरं  भरलंय  अंगाला , संयमच  होतोय  नष्ट
आता  "आत्महत्या"  हा  एकचं  पर्याय , हाच  या  रवी  बिरादाराचा  अंतिम  निर्णय ,
सुटतील  सारे  प्रश्न  चुटकीसरशी , चित्र  दिसतंय  सारंच  आता  सुस्पष्ट .

(3)
आजवर  कित्येक  बंधूनी  केल्यात  "आत्महत्या" , वाट  पाहून , कंटाळून
डोळ्यातील  पाणी  खळत  नाहीय  माझ्या , कुटुंबाची  चाललेली  उपासमारी  पाहून
संपाला  काही  उत्तर  नाहीय  मिळत , सरकार  ताकास  तूर  लागू  देत  नाहीय ,
माझी  ही  दयनीय ,अगतिक  अवस्था  त्यांच्यापर्यंत  पोहोचतच नाहीय .

(4)
माझ्याप्रमाणे  माझे  इतरही  बंधू  आहेत , "आत्महत्येच्या"  रांगेत  उभे
हताशा ,निराशा ,दुःख ,वेदना ,यातना  ओलांडून  जायचंय  आम्हा  फार  दूरवर
जिथे  मिळेल  मग  शांतता ,संपेल  सारंच , हे  भोग  नाहीत  भोगावे  लागणार ,
माझ्या  मरणाचा  फास  मी  स्व -हस्तेच  करून  ठेवलाय  तयार  !

(5)
गर्भ -गळीत  मी , काहीच  नाहीय  सुचत , आता  सुटकाच  यातून  नाही
माझ्या  डोळ्यासमोरच  मी  माझ्याच  मरणाची  वाट  पहात  राही
खचून  गेलोय ,आत्म -विश्वास  हरवलाय , निराशेच्या  खोल  गर्तेत  बुडत  चाललोय ,
झोप  नाहीय ,भकास  उघड्या  डोळ्यांनी  मी  माझेच  छत  न्याहाळतोय  !

(6)
बस  आता  फक्त  एकचं  दिवस  उरलाय , माझ्या  मरणाचा , "स्व -हत्येचा"
होतील  तेव्हा  होतील  मागण्या  मान्य , होतील  तेव्हा  होतील  प्राप्त  अधिकार
आता  ती  वेळ  निघून  गेलीय , जीवनात  काळ -रात्रच  जणू  उगवलीय ,
आता  मृत्यूच्या  कुशीतच  चिर -निद्रा  घेण्याची  वेळ  जवळ  आलीय .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.12.2021-गुरुवार.