चारोळ्या-"जय हनुमाना,घालितो आम्ही प्रदक्षिणा,वर द्या आम्हा मिळाया आमची दक्षिणा"

Started by Atul Kaviraje, December 10, 2021, 12:15:07 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

 विषय : वाशीम  येथे  ST कर्मचाऱ्यांचे  अर्ध -नग्न  होऊन , हनुमान  मंदिरात  लोटांगण  प्रदक्षिणा   घालीत  आंदोलन .
    वास्तव-ST कर्मचाऱ्यांचे  हनुमान  मंदिरी  लोटांगण  प्रदक्षिणा  आंदोलन -चारोळ्या
     "जय हनुमाना,घालितो आम्ही प्रदक्षिणा,वर द्या आम्हा मिळाया आमची दक्षिणा"
--------------------------------------------------------------------------


(1)
ST कर्मचारी  "मारुतीच्या"  देवळात , एकसुरात  "हनुमान"  स्तवन  करताहेत
अर्ध -नग्न  होऊन  देवळास  "लोटांगण  प्रदक्षिणा"  हिकमतीने  पूर्ण  करताहेत
मुखी  अखंड  त्यांच्या , "हनुमान"  चालीसा  जप , मंत्र -पठण  आहे ,
त्यांच्या  या  अनोख्या  आंदोलनाचे  पूजा-कार्य , "हनुमान" -मूर्ती  कौतुके  पहात आहे .

(2)
सारे  प्रयास  निष्फळ  ठरले , अवघे  प्रयत्न  करून  ST कर्मचारी  थकले
आता तुझाच  सहारा  "हनुमंतI" , म्हणत  ते , "बजरंगबलीला"  साकडे  घालीत  आहेत
आता  तूच  पाव  आम्हा , दाखव  तुझ्या  शक्तीचा  बडगा , सरकारला  लवकरच ,
म्हणत ते  सारे "लोटांगण"  घालीत, "हनुमानाची" भक्ती ,पूजा , स्तवन  करीत  आहेत .

(3)
आता  ही  शक्ती -देवताच  आम्हाला  तारेल ,या  संकटातून  निवारेल
हा  शक्ती -युक्तीचा  स्वामी , वज्रदेही  "महाबलीच"  हाकेला  धावून  येईल
शरण  आलेत  सारे  ST कर्मचारी , या  बल -मूर्तीस  शेंदूर -वर्णित ,
नक्कीच  हा  "राम -भक्त"  मार्ग  दाखवील  आम्हा ,आमच्या  संकटाचे  हरण  करील .

(4)
"हनुमानाची"  वज्रमूठ ,शक्तिशाली  गदा , ते  सरकारला  दाखवून  देताहेत
हा  शक्तीचा  स्रोत , ते  आपल्या  गात्रागात्रांत , नसानसांत  भरत  आहेत
१०८  "लोटांगण  प्रदक्षिणेचा"  अविरत  संकल्प  सोडून , घामाघूम  होऊन ,
मंदिरात  जय  "बजरंगबलीचा"  घोष  करीत , वरदानाची  याचना  करीत  आहेत .

(5)
सर्व  उपाय  थकल्यावर , अंती  मनुष्य  त्या  शक्तीकडे  धाव  घेतो
ही  अदृश्य  शक्तीच  त्याला , त्याच्या  कार्यात  नित्य , मनोबल , मनःशक्ती  देत  असते
आज  त्या  शक्तीचीच  आराधना , हे  ST कर्मचारी , मनोभावे  करीत  आहेत ,
आपले  हे  शक्ती-देवता  उपासना  तप  पूर्ण  होईल , ते  फळाचीच अपेक्षा  करताहेत .

(6)
ST कर्मचाऱ्यांचे  आत्मबल  या  "लोटांगण  प्रदक्षिणेने"  वाढत  चालले  होते
"हनुमानाचे"  सोज्वळ,तेजस्वी ,बलशाली  रूप  त्यांना  अनोखी  स्फूर्ती  देत  होते
"भीमरूपी महारुद्रा  वज्रहनुमान  मारुती" , त्यांचे  प्रेरणा -स्थान  ठरले  होते ,
आता  हे  अनोखे  आंदोलन  विलीनीकरण  होईपर्यंत , असेच  सुरु  राहणार  होते .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.12.2021-शुक्रवार.